Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३५ )

आपला कुशान वंश प्रस्थापित केला; या राज्यकर्त्याच्या वेळेपासून हिंदुस्थान व रोम (इताली ) या देशांमधील व्यापारी दळणवळण वाढत गेलें; हिंदुस्थानांतून रेशीम, लवंगा, वेलदोडे, हिरे, माणकें व निरनिराळे रंग वगैरे जिन्नस मोठया प्रमाणांत तिकडे रवाना होऊं लागले, व त्याऐवजीं तिकडून हिंदुस्थानांत सोनें येऊं लागले. या राजानें रोमन बादशहा ट्रेजन याच्या दरबारी - आपल्या विज- याची व वंश स्थापनेची हकीकत कळविण्याकरितां एक वकीलमंडळ पाठविले होतें, आणि पूर्वेस काशी आणि अफगाणिस्थानापासून तो थेट हिंदुकुश पर्वता- पर्यंत, व सिंध, पंजाब, वगैरे प्रांतासह थेट हिमालय पर्वतापर्यंतचा, सर्व प्रदेश त्यानें आपल्या अमलाखालीं आणून तो पुष्कळच बलाढ्य व वैभवसंपन्न बनून गेला होता; हा राज्यकर्ता इ. सन १२५ या वर्षी मृत्यु पावला, व त्यानंतर त्याचा दूरचा नातलग आणि वजेष्य अथवा वजेष्क याचा मुलगा कनिष्क हा गादीवर भाला. या राजानें उत्तर हिंदुस्थानांत थेट मथुरेपर्यंतच्या प्रदेशावर आपला अंमल बसविला, आणि काश्मीर प्रांत जिंकून कनिष्कपूर या नांवाचें एक शहर वस- विल; हा राज्यकर्ता मोठा शूर असून याच्या कारकीर्दीत कुशान राज्याचा अतीशय उत्कर्ष झाला. शिवाय त्याने मौर्य राजघराण्यांतील राज्यकत्यं प्रमाणेंच बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्यास आश्रय दिला, त्यामुळे बौद्ध धर्म पुन्हां जोरांत आला; त्याच्या प्रारंभींच्या नाण्यांवर सूर्यचंद्राची चित्रे असून त्यावरील अक्षरें ग्रीक भाषेत लिहिलेलीं होतीं; परंतु पुढें त्यानें बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर बुद्धाचें चित्र असलेलीं नाणीं पाडिलीं. तथापि तो हिंदु देवतांचीही पूजा करीत असे कनिष्कानें आपल्या कारकीर्दीमध्ये एक महान् बौद्ध धर्म परिषद् भरवून अश्वघोष करविला. या परिषदेचा अध्यक्ष वसुमित्र हा असून, कनिष्कानें पाटली- पुत्र नगरावर चढाई करून त्या ठिकाणाहून परत फिरतांना आपणाबरोबर आणि- लेला विद्वान् भिक्षु अश्वघोष हा तिचा उपाध्यक्ष होता. या ठिकाणीं अजमासे पांच बौद्ध धर्मानुयायी पंडित मंडळी एकत्र झाली होती, व प्राचीन कालापा- सूनच्या निरनिराळया बौद्ध ग्रंथांसंबंधीं उहापोह व विवेचन करण्यांत आले होते; या राज्यकर्त्याच्या काळापासून चीन देशांत बौद्धधर्माची स्थापना झाली; व वरील परिषदेतील वाटावाटीनंतर जे मोठमोठाले टीका ग्रंथ लिहिण्यांत आले, त्यांतील 'महाविभाषा' या नांवाचा ग्रंथ आजतागायत चिनी भाषेत उपलब्ध आहे; कनिष्कानें बौद्धधर्मानुयायी जनतेच्या शिक्षणाकरितां एक भव्य बिहार