Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३३ )

आपल्या राज्यांत सामील करून त्याने हिंदुस्थानांत ' ग्रीको-बॅक्ट्रियन ' राज्य स्थापन केलें. त्यानंतर लवकरच, इ. स. पूर्वी १६० ह्या वर्षी तुर्की लोकांपैक 'शक' अथवा ' सीथियन ' हे काराकोरामच्या डोंगरांतून सिंधुनदाच्या खोऱ्याच्या मार्गाने हिंदुस्थानांत शिरले; याच शक लोकांची एक टोळी अफ- गाणिस्थानाकडे वळली, व तिर्ने पश्चिम अफगाणिस्थान जिंकून तेथें ' शक- स्थान' या नांवाचे आपले एक स्वतंत्र राज्य स्थापन केले; इकडे हिंदुस्था नांत आलेल्या दुसऱ्या टोळीनें सिंध, गुजराथ व माळवा, हे प्रांत मिनॅडर- पासून हिसकावून घेऊन तेथे आपले राज्य स्थापन केलें. मिनॅडरच्या पराभ वानंतर कोणत्याही युरोपियन राष्ट्राने हिंदुस्थानावर खुष्कीच्या मार्गानें स्वारी करण्याचा प्रयत्न केला नाहीं; इतकेंच नाहीं तर इ. सन १५०२ पर्यंत म्हणजे वास्कोदिगामा कालिकत येथे येईपर्यंत युरोपियन लोकांपासून हिंदुस्थान देशाला कोणत्याही प्रकारे उपसर्ग पोहोंचला नाहीं.
 तथापि राजा पुष्यमित्र हा शूर असून, त्याची सद्दी जोरांत असल्या- वेळीं त्यानें अश्वमेध यज्ञ करण्याचे ठरविलें, व आपला मुलगा वसुमित्र याज- बरोबर कसलेलें सैन्य देऊन अश्व सोडिला; परंतु मिनॅन्डरच्या यवन सैन्याने सिंधुनदाच्या तीरावर तो अश्व अटकविला; तेव्हां वसुमित्राने त्या सैन्याचा पराभव करून तो अश्व सोडवून यशस्वीपणे परत आणिला व त्यानंतर पुण्य- मित्राने त्या यज्ञाची पूर्तता केली; नंतर लवकरच, म्हणजे इ. सनापूर्वी १४८ यावर्षी तो मृत्यु पावला; व पन्नास वर्षांच्या आंतच हे घराणे मोडकळीस येण्यास प्रारंभ होऊन त्याच्या राज्याचे बाकी राहिलेले निरनिराळे अवयवही स्वतंत्र होण्याच्या मार्गास लागले; पुढें इ. सनापूर्वी ११९ च्या सुमारास सुंग घरा- ण्याची सर्व राज्य सूत्रे कण्त्र अथवा कण्वायन घराण्यांतील ब्राह्मण प्रधान वसुदेव याच्या हाती गेली; पुष्यमित्रानंतर अग्निमित्र वगैरे एकंदर नऊ राजे गादीवर आले, आणि शेवटचा म्हणजे दहावा विषयासक्त राजा देवभूति याचा वसुदे- वानें वध करून इ. सनापूर्वी ८२ या वर्षी ह्या सुंग घराण्याचा शेवट केला; व आपल्या कण्वायन उर्फ कण्व वंशाची स्थापना केली.
 या कण्व वंशीय पुरुत्रांच्या हातीं अजमायें पंचावन वर्षे राजसत्ता कशी- बशी तगून राहिली होती; वसुदेवानंतर गादीवर आलेले तीन्होंही राजे दुर्बल