Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३२ )

मिळून 'कलिंग' या नावाचा एक देश असून तेथे खरवेल या नांवाचा एक जैन धर्माचा पुरस्कर्ता असलेला राजा राज्य करीत होता; आणि पुष्यमित्राचा मुलगा अग्निमित्र हा ज्या पश्चिम माळवा प्रांताचा कारभार पहात होता, त्याला लागूनच दक्षिण विदर्भ व आंध्र राज्य होतें; व तेथे याज्ञसेन शतकर्णी या नांवाचा एक राजा राज्य करीत होता या राज्यकर्त्याची व अग्निमित्राची कांहीं कार- णावरून लढाई जुंपली; त्या वेळी कलिंगाधिपति खरवेल हा शतकर्णी याच्या मदतीस गेला; तथापि अमिमित्राने या उभयतांचाही पराभव करून त्यांनां माघार घेणे भाग पाडले. कलिंग देश हा या वेळीं पुष्यमित्राच्या सार्वभौम सत्तेखाली होता; त्यामुळे खरवेल याने आपल्या मुलाविरुद्ध शतकर्णी यांस मदत केल्याबद्दल पुष्यमित्रास राग येऊन त्यानें खरवेल याजवर स्वारी केली; परंतु तींत त्याचा पूर्ण पराजय होऊन त्यास कलिंग देशावे स्वातंत्र्य मान्य करावें लागले, व पुष्यमित्राची तिकडील सार्वभौम सत्ताही नाहींशी होऊन त्याचें राज्य पुष्कळ प्रमाणांत दुबळें व कमजोर झाले. हिंदुस्थानांत वैभवसंपन्न, बलिष्ठ व जोरदार असें मौर्य साम्राज्य जोपर्यंत जिवंत स्थितींत होतें, तोंपर्यंत मध्य आशियांतून या देशांवर होणाऱ्या स्वान्यांना पूर्णपणे आळा बसला होता; परंतु तें साम्राज्य नष्ट झाल्यावर मध्य आशियांतून परकीय लोकांच्या टोळ्या, वसाहती अथवा लूटपाट करण्याकरितां या देशांत वारंवार येण्यास सुरवात झाली. इ. सनापूर्वी तिसन्या शतकाच्या मध्याच्या सुमारास पार्थिया व बॅक्ट्रिया, या देशाचे ग्रीक वंशाचे राज्यकर्ते सेल्युकिडीचा अंमल झुगारून देऊन स्वतंत्र झाले, व ते नेहभों हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवर स्वाया करूं लागले. पुढे इ. सनापूर्वी १८० च्या सुमारास बॅक्ट्रिया येथील राज्यकर्ता डेमोट्रियस यार्ने अफगाणिस्थान देश आपल्या हस्तगत करून घेतला, व पंजाब प्रांतावर स्वारी करून हिंदुस्थानांतील हा भाग त्यानें आपल्या अमलाखाली आणिला; परंतु त्याचा प्रतिस्पर्धी युक्रेटिडेस यानें त्याचा पराभव करून अफ गाणिस्थान व पंजाब हे दोन्हीही प्रांत आपल्या स्वाधीन करून घेतले, याच काळाच्या सुमारास म्हणजे इ. सनापूर्वी १५५ ते १५३ या मुमारास काबू. लचा राजा मिनॅडर याने हिंदुस्थानावर स्वारी केली, आणि सिंध प्रांताचा सुभे दार व अनिमियाचा मुलगा वसुमित्र याचा पराभव करून त्यानें तो प्रति आपल्या हस्तगत करूत घेतला व क्रमाक्रमानें गुजराथ व माळवा हे प्रांत