Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ३१ )

आपल्या राज्याचा विस्तार करावा, हॅ राज्यकर्त्याचे कर्तव्य आहे, हा समज - माझ्या वंशजांनी आपल्या मनांतून समूळ काढून टाकावा; कारण राज्यकर्त्याचा मुख्य विजय ह्मणजे धर्माने आचरण करणे हा होय. " अशोक हा स्वतः राज्यकारभार पहात असून त्याच्याइतकें काम करणारा राजा क्वचितच आढळेल; तथापि तो इतका उद्योगनिष्ठ होता कीं, इतकें काम करूनही, त्याला आपण फारसे काम करीत नाहीं असें वाटत असे; आणि "माझ्या हातून व्हार्वे तितकें काम होत नाहीं, याबद्दल मला फार वाईट वाटतें; जगाच्या कल्याणाकरितां मला काम केलेच पाहिजे; " असें तो नेहमीं ह्मणत असे; हा पुण्यश्लोक राजा इ० सनापूर्वी २३१ ह्या वर्षी मृत्यु पावला; या राज्यकत्याने राज्यकारभाराची जी उत्तम शिस्त आंखून काढिली ती त्याचा नातू दशरथ ह्याच्या काळापर्यंत तशीच चालत आली; परंतु त्यानंतर सर्वत्र अव्यवस्था होण्यास प्रारंभ झाला, आणि शेवटों त्याचा सहावा वंशज बृहद्रथ यास त्याचा सेनापति पुष्यमित्र यानें पदभ्रष्ट करून आपण मगध देशाची गादी बळकविली; (इ०स० पूर्वी- १८४ ) त्यानंतर पदभ्रष्ट झालेला वृहद्रथ मगध प्रांतांतून निघून राजपुतान्या- पैकीं मेवाड प्रांती आला, व त्या प्रदेशांतील धार व चितोड हीं शहरे काबीज करून तेथे त्यानें आपल्या राज्याची स्थापना केली; ह्या ठिकाणीं त्याचे वंशज इ० सन ७३० पर्यंत राज्य करीत होते; अशा रीतीनें, वर लिहिल्याप्रमाणे मगध देशांतील मौर्य वंशाचा नाश होऊन, पुष्पमित्राने ( इ० सनापूर्वी १८४ या वर्षी ) आपल्या सुंग अथवा शुंग घराण्याची स्थापना केली.

 पुष्यमित्र हा गादीवर आल्यावर त्याने आपला मुलगा अग्निमित्र यास नर्मदा नदीकडील प्रांताचा प्रतिनिधि नेमिलें; याची राजधानी विदिशा म्हणजे हल्लींचं भिलसा ( हैं ठिकाण शिंद्याच्या राज्यांत आहे. ) हैं शहर होते. या ठिकाणीं व आसपास बौद्ध काळांतील बरीच कोरीव लेणी असून, तेथून जवळच असलेला सांची येथील स्तूप हल्लींही कायम आहे; या पुष्यमित्राच्या कारकीर्दीत ब्राह्मणधर्म जोरांत येऊन बौद्ध धर्माचे प्राबल्य कमी झाले; इतकेंच नाहीं तर तो बौद्ध धर्माचा द्वेष्टा असल्यामुळे त्या धर्मियांचा त्याने छळ केला; त्यामुळे त्याच्या संबंधी अतीशय अप्रोति उत्पन्न होऊन फक्त अयोध्या व बहार या प्रांतावरच काय ती त्याची सत्ता शिल्लक राहिली. या वेळीं हलींचा ओढ्या अथवा ओढिया प्रांत व उत्तर व दक्षिण सरकार हे प्रांत