Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३० )

- नांवाची लिपी तयार केली, व तिचा त्यांनीं प्रथम आपल्या व्यापारी व्यव हारात उपयोग करण्यास सुरवात करून पुढें ती नेपाळपर्यंत सर्वमान्य झाली. गौतम बुद्ध मृत्यु पावल्यावर त्यास ज्या दगडी पेटींत पुरिलें त्या पेटीवर लिहिलेला लेख या ब्राह्मी भाषेतील असून तो उपलब्ध लेखांपैकी पहिला आहे; व अशोकाच्या आशाही याच लिपींत खोदलेल्या व लिहिलेल्या आहेत. सारांश, अलीकडील शोधाप्रमाणे म्हणावयाचे म्हणजे 'ब्राह्मी' हीच हिंदुस्थानातील पहिली लिपी असुन त्यानंतर, अथवा तिच्यापासून इतर निरनिराळ्या लिपी उत्पन्न झाल्या आहेत.
 मौर्य कुलोत्पन्न राजा अशोक यानें बौद्ध धर्माचा स्त्रीकार केला, म्हणजे बौद्ध धर्माप्रमाणे जातिभेद नाहीं या मताचा त्यानें स्वीकार केला. तथापि यापूर्वीच या गोष्टींचा उपक्रम त्याचा अत्यंत प्रतापशाली पितामह चंद्रगुप्त यानें केलेला आहे; याच चंद्रगुप्तावर इसवी सनापूर्वी ३०५ या वर्षी सीरिया देशाचा राजा सेल्यूकस निकेटर यानें स्वारी केली होती, परंतु तिजमध्ये त्याचा पूर्ण पराभव होऊन त्यास माघार घेणें भाग पडले. इतकेंच नव्हे तर त्याला, आपल्या प्रांतांपैकीं पारोपसी नदी, आरिया, व भाराचेशिया, हे प्रांत चंद्रगुप्त यास द्यावे लागले; ह्याशिवाय, त्यानें चंद्रगुप्ता- - बरोबर आपल्या मुलीचें लग्रही लावून दिलें. ( इ. सनापूर्वी ३८३ Ancient India as described by verious Greek Writers by Mc. Crindle ) ह्या प्रांताच्या काबूल, हिरात व कंदाहार, ह्या अनु- क्रमें राजधान्या होत्या. या चंद्रगुप्तासंबंधाने विशेष लक्षांत ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे की, हिंदुराजार्ने युरोपियन (ग्रीक) राजकन्येशी विवाह केल्याचें हिंदुस्था- नच्या प्राचीन इतिहासांत हे पहिलेच उदाहरण आहे.
 चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार अथवा अमित्रघात हा इ० सनापूर्वी २७२ या वर्षी मृत्यु पावल्यावर त्याचा मुलगा अशोकवर्धन ऊर्फ अशोक हा गादीवर आला; या राज्यकर्त्याने सतत ४१ वर्षेपर्यंत राज्य केले. अशोक हा मोठा दयाळू, कोमल मनाचा व प्रजावत्सल राज्यकर्ता होता. इ० सनापूर्वी १६१ या वर्षी कलिंग येथील राज्यकर्त्याबरोबर झालेल्या भयंकर युद्धांत अतीशय मानवी संहार झाल्यामुळे त्याच्या मनास विशेष दुःख झाले, आणि त्याने पुढे * आपल्या तेराव्या शिलालेखात असे लिहून ठेविले की, “ दुसन्यार्शी युद्ध करून