Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २९ )

उपदेश करण्याचा क्रम त्याने सुरू केला. या काळांत ब्राह्मणवर्ग हा फक्त उच्च वर्णांतील लोकांनांच असा सन्मार्गोपदेश करीत असे; परंतु बुद्धाच्या ह्या नवीन धर्मांत जातिभेदाचा गंध नसून तो सर्वांनां सारखे समजून उपदेश करीत असे; त्यामुळे या धर्माची बहुजन समाजावर छाप चतत चालली, व बौद्धधर्माचा दिवसेंदिवस उत्कर्ष होत जाऊन त्याचा अतीशय जलद व जगाच्या अतीशय विस्तृत भागामध्ये प्रसार झाला. सिद्धार्थ गौतम यानें आपल्या वयाच्या ३६ व्या वर्षापासून उपदेश करण्यास सुरवात केली, व याच वेळेपासून त्यास 'बुद्ध' म्हणजे ज्ञानी, ही संज्ञा प्राप्त झाली. गौतम बुद्ध यानें सतत चाळीस वर्षे आपल्या धर्माचा लोकांस उपदेश केला, व तो ८० वर्षाचा होऊन इ० सना- पूर्वी ४८३ ह्या वर्षी मृत्यु पावला. या धर्माचीं साधारणतः मुख्य चार तत्त्वें असून तीं अहिंसा, भूतदया, मनोनिग्रह व शुद्धाचरण, हीं आहेत; आणि इच्छेचा नाश करून पुनर्जन्म बंद करणें, व निर्माण अथवा मोक्षपद मिळविणें, हैं या धर्माचे साधारणतः आद्य ध्येय ठरलेलें आहे.
 याच काळांत इ० सनापूर्वी ३५० च्या सुमारास प्रसिद्ध वैव्याकरणज्ञ पाणिनी हा निर्माण झाला व त्यानें 'अष्टाध्यायी' या नावाचा एक प्रसिद्ध ग्रंथ निर्माण केला; याच काळांत महाभारत, रामायण, व सूत्र ग्रंथ वगैरेंची रचना करण्यांत आली आहे, व महाभारत, वगैरे वरील ग्रंथ अत्यंत अमौल्य, विचारपरिप्लुत व विद्वत्तादर्शक असून आज तागायत त्यांचा श्रेष्ठपणा कायम राहिला असल्याचे निदर्शनास येत आहे.
 हिंदुस्थान देशाच्या या काळांतील परदेशीय व्यापारविषयक बाबती- संबंधानें म्हणावयाचें म्हणजे, या पूर्वीच्या अति प्राचीन काळापासून या देशाचा इतर देशाशी चालू असलेला व्यापार या काळातही तसाच चालू राहिला होता; व इ. सनापूर्वी ६०० च्या सुमारास तो खंबायतच्या आखां- तांतील भडोच वगैरे बंदरांमधून इराणी आखातांतून पुढें युफ्रेतीस नदीच्या मुखाकडे बाबिलोनिया देशाशीं व त्याच्या मार्फत पुढें चालू होता; त्या देशांत या वेळीं अरबी अथवा अरेबियन भाषा चालत होती, म्हणून हिंदुस्था- नांतून त्या देशाशीं व्यापारी दळणवळण ठेवणारे, व त्या देशांत व्यापारा-: करितां जाणारे, लोक ती लिपी शिकून हिंदुस्थानांत आले; त्यानंतर त्यांनी तिच्यांत इष्ट ते फेरफार करून हिंदुस्थानांत एक नवीनच ' ब्राह्मी' या