Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २८ )

 अशा रीतीनें सिद्धार्थ गौतम यास विरक्ति उत्पन्न होऊन संसार व • सुखोपभोग यांवरून त्याचे मन उडून गेलें; आपल्या जन्माचें कसे सार्थक होईल, व आपल्या मनास अढळ शांतता केव्हां मिळेल, अशी त्याच्या मनास विवंचना लागून गेली; आणि यांशिवाय इतर कोणत्याही बाबतींत त्याचं मन रममाण होईनासे झाले. याच सुमारास त्याची प्रिय पत्नी यशोधरा हिजपासून त्यास एक पुत्ररत्न झाले. त्या वेळीं राजा शुद्धोदन यानें आपल्या नातवाच्या जन्मप्रीत्यर्थ मोठ्या आनंदाने उत्सव समारंभ केले; परंतु त्यामुळे ही गौत- माच्या मनांत उत्पन्न झालेली विरक्ति ढळली नाहीं; अखेरीस आपल्या - मनाचा पूर्ण निर्धार करून त्याने वैराग्याश्रम घेण्याचे निश्चित केलें, व राजवा- ड्यांतून आणि राजधानींतूनही निघून जाण्यापूर्वी आपल्या पत्नीची भेट घेण्या- करितां तो अंतःपुरात गेला; तेव्हां निर्द्वैत असलेली आपली प्रिय व सौंदर्य- संपन्न स्त्री, व नुकताच जन्मास आलेला सुंदर पुत्र, हीं एकदम त्याच्या दृष्टीस पडली. त्याबरोबर प्रेमानें थरारून जाऊन त्यास पुन्हां मोह उत्पन्न झाला, व जागच्याजागींच तो बुटमळत राहिला; परंतु क्षणातच हे मोहपटल झुगारून देऊन तो आपल्या प्रिय पत्नीची भेटही न घेतां तसाच बाहेर आला, व एका सारथ्याच्या साह्याने राजधानींतून बाहेर निघून गेला. बराच दूर गेल्यावर त्यानें आपल्या अंगावरील राजभूषणे व घोडा सारथ्याच्या स्वाधीन करून त्यास राजधानीस परत जाण्याची आज्ञा केली, व तो तसाच पुढे चालता झाला. मार्ग क्रमीत असतां त्याने आपल्या अंगावरील मौल्यवान् कपडे एका भिका- न्यास देऊन त्याचे कपडे आपण वेतले व आपल्या डोक्याचे लांब सडक कैंस काढून एखाद्या भणंग भिकाऱ्याप्रमाणे तो पुढे गेला. अशा रीतीने प्रवास करीत तो पहिल्याने पाटणा प्रांतांत आला; तेथे दोन योगी पुरुषाजवळ त्यानें कांहीं काळ अध्ययन केले, आणि 'देहाला कष्ट दिल्याशिवाय आत्म्याला कधींही शांतता प्राप्त व्हावयाची नाहीं' असा त्यांनीं उपदेश केल्यामुळे पाटणा - राजगृह येथून तो गया येथे गेला, व तेथील अरण्यांत सतत सहा वर्षे घोर तपश्चर्या करून त्यानें आपला देह क्षीण करून टाकिला; तथापि त्याच्या मनास शांतता प्राप्त झाली नाहीं; तेव्हा तो काशी येथे गेला,आणि त्या टिकाणी राहून व उत्तम प्रकारचे ज्ञान संपादन करून त्याने बौद्ध धर्म संस्थापनेचे कार्य हातीं घेतले; व - त्यानंतर तेथून जवळच असलेल्या प्रसिद्ध मृगारण्यांत जाहीर रीतीने लोकांस