Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २७ )

इलाज बाकी राहिला नसून आतां अल्पावकाशांतच तो मृत्यूच्या आधीन होणार आहे. X
 सारख्याचे याप्रमाणे भाषण ऐकल्यावर त्या दिवशीही पूर्वीप्रमाणेंच सिद्धार्थ गौतम यानें त्यास राजवाड्याकडे आपला रथ परत नेण्याची आज्ञा केली. तथापि या प्रसंगी त्याच्या मनाची पहिल्यापेक्षांही अधिक खळबळ उडून गेली व तो विचारमग्न होऊन दुःखानें अतीशय व्याप्त झाला. त्यानंतर कांहीं काळाने तो पुन्हांही पूर्वीप्रमाणेच फिरण्यास निघाला असतां एक प्रेत त्याच्या नजरेस पडले; तेव्हां त्यानें सारथ्यास विचारिलें:-
 गौतमः - हे सारथे, हे काय चालले आहे ? हे लोक एका माणसास खाटल्यावर ( अथवा तिरडीवर ) ठेवून का नेत आहेत ? त्याच्या पाठीमागून ज्यांचे केश अस्ताव्यस्त झाले आहेत असे हे लोक कां चालले आहेत १ आणि वे चालतांना छाती पिटून आक्रोश कां करीत आहेत ?
 सारथि:- महाराज, हा मनुष्य मृत्यु पावला आहे; इत: पर तो आपल्या डील मनुष्यांस स्त्री व मुलेबाळे यांस व इष्ट मित्रांस पाहू शकणार नाहीं; तो या जगांतून कायमचाच चालला आहे !

सारथ्याचें हें अत्यंत करुणास्पद व हृदयाला घरे पाडणारे मृत्यूसंबं- धाचे शब्द ऐकून गौतमाचें कोमल अंतःकरण अत्यंत विव्हल झालें आणि तो मोठ्या दु:खाने म्हणाला:-" ज्या तारुण्याचा शेवट वार्धक्यावस्थेत होतो त्या तारुण्यास धिक्कार असो ! ज्या आरोग्यास असंख्य रोग जडतात त्या आरो. ग्यास धिक्कार असो !! आणि ह्या गोष्टी समजून जो ज्ञाता पुरुष बिलासांत मन होऊन राहतो त्यालाही धिक्कार असो !! +


X किं सारथे पुरुषरूपविवगात्रः सर्व्वेन्द्रियैर्हि विकलो गुरु प्राश्वस्तः ॥
सर्वांशुष्क उदारकुल प्रातकृच्छ्रा मूत्रे पुरीष स्वकि तिष्ठति कुन्सनीये ॥
एषो हि देव पुरुषः परमं गिलानो व्यधिभयमुपगतो मरणान्तप्राप्तः ॥
आरोग्यतेजरहितो बलविप्रहीनो ह्यत्राणविप्रशरणो ह्यपरायणश्च ।।
+ किं सारथे पुरुष मञ्चोपरि गृहितो उद्धृत केशनखपांशु शिरे क्षिपन्ति ॥
परिचारवित्वा विरस्तुव स्ताडयन्तो नानाविलाघवचनानि दीरयन्तः ॥
एषो हि देव पुरुषो मृत्यु जम्बुद्वीपे न हि भूयो मातृ पितृ द्रक्ष्यति पुत्र दारन् ||
अपहाय भोगगृह मातृ मित्र ज्ञातिसङ्ग परलोक प्राप्तु नहि द्रक्ष्यति भूय ज्ञातिम् ||
धिग् यौवनेन जरया मम भिद्रुतेन आरोग्य धिग्विविधव्या धिपराहतेन ॥
धिग् जीवितेन पुरुषो न चिवस्ति तेन । धिक् पंडितस्य पुरुषस्य रतिप्रसंगैः ॥