Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६ )

तें मला सांग याचे खरें कारण काय आहे तें तूं मला लवकर कथन कर; कारण त्यामुळे मला त्या विषयावर विचार करण्यास बरे पडेल.
 सारथि–महाराज, हा सृष्टिनियम आहे. प्रत्येक पुरुष, स्त्री, आणि मुलें, या सर्वाना अखेरीस हीच स्थिति प्राप्त होते; तुमचे वडील, तुमचे नातलग आणि आपणसुद्धा या सर्वांस अखेरीस हीच स्थिति प्राप्त व्हावयाची आहे. या सर्वांना अखेरीस हीच स्थिति प्राप्त होते. *
 सारथ्याचे हे शब्द ऐकून सिद्धार्थ गौतमाच्या मनास मोठा धक्का बसला; त्याच्या मनाची विलक्षण खळबळ उडाली, व 'धिक्कार असो या जन्माला असे उद्गार त्याच्या तोंडून निघाले; आणि त्यानें सारथ्यास राजवाड्याकडे स्थ परत फिरविण्यास आज्ञा केली. पुढें पुन्हां दुसऱ्या एका वेळीं तो पूर्वी- प्रमाणेंच रथांत बसून बाहेर फिरण्यास निघाला; त्यावेळीं रस्त्याच्या बाजूस पडलेला एक निराश्रित दुखणेकरी त्याच्या पाहण्यांत आला; तेव्हां त्यानें आपल्या सारथ्यास प्रश्न केला:-
 गौतमः- हे सारथे, ज्याचे अस्थि-पंजर मात्र उरले आहेत, व जो स्वतः च्या मल-मूत्रांत लोळत पडलेला असून दुःखातिशयामुळे मोठमोठ्यानें कण्हत राहिला आहे, असा हा कोण आहे ?

 सारथिः - महाराज, हा एक व्याधिग्रस्त मनुष्य असून सांप्रत त्याच्या दुःखाची परमावध झाली आहे; त्याचा मृत्युकाळ नजदीक आला आहे; त्याची जगण्याची सर्व आशा आता नष्ट झाली आहे; व त्यासंबंधी कोणताही


  • किं सारथे पुरुष दुर्बल अल्पस्थाम उच्छुष्कमांसरुधिरत्वचस्नायुनद्धः ॥

तशिरोविरलदन्त कृशाङ्गरूप आलंवदण्डव्रजरेह सुखं स्वलन्त ॥
एषो हि देव पुरुषो ज्वराभिभृतः, क्षीणेंद्रियः सुदुःखितो बलवीर्यहीनः ॥
बन्धुजनेन परिभूत अनाथ कार्यः कार्य्यासमर्थ अपविद्धवानेव दारु ||
कुलधर्म एष अयमस्य हितं भला हि अथवाऽपि सर्व्वजगतोऽस्य इत्थं ह्यवस्था ॥
शीत्रं भणाहि वचनं यथाभूतमैतच्छ्रुत्वा तमर्थमिह योनिसचिन्तयिष्ये ॥
तस्य देवकुलधर्म राष्ट्रधर्मः सर्व्वे जगस्य जरयौवनं धर्षयन्ति ॥
तुभ्यमपि मातृपितृवांधव ज्ञातिसङ्गो जरया अमुक्तं नहि अन्यगतिर्जनस्य ||