Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२५)

या नावाच्या एका सुन्दर राजकन्येबरोबर त्याचें लग्न करून दिलें. लग्नानंतर -सुमारे दहा वर्षांनीं त्यास एक मुलगा झाला; तथापि खालील कारण घडून, त्याच्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे तो राज्यकर्ता न बनतां एक प्रसिद्ध धर्मसंस्था- पक म्हणून कीति पावला. गौतम ऊर्फ सिद्धार्थ गौतम हा नेहमीं रथांत बसून शहरांतून सहल करीत फिरत असे; तेव्हां मार्ग कमीत असता रस्त्यानें · म्हातारे, रोगी व मृत्यूचा भयंकर देखावा, वगैरे प्रकार त्याच्या नेहमी पाह- ण्यांत येत असत. त्याप्रमाणे एके दिवशीं तो फिरत असतां असाच प्रकार त्याच्या दृष्टोत्पत्तीस आला तेव्हां त्यासंबंधीं त्याचा व त्याच्या सारख्याचा परस्परांशी मोठा करुणास्पद संवाद झाला. या संवादांतील संस्कृत भाषा जुन्या गाथेतील असल्यामुळे त्यांतील भाषा कोठेंकोठें भर्वाचीन संस्कृत भाषेशी जुळणारी नाहीं; तरी तो मूळ संवाद विशेष मननीय असल्यामुळे टिपेंत मूळ संस्कृत देऊन, मराठी भाषेतच त्याचा गोषवारा या ठिकाणी - प्रथित केलेला आहे. गौतम बुद्ध हा एके दिवशीं रथांत बसून जात असतां एक वृद्ध व अशक्त मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला, तेव्हां आपल्या सारथ्याकडे वळून त्यास तो म्हणाला:-
 गौतम - हे सारथे, अशक्त व अस्थिपंजर झालेला असा हा कोण आहे ? त्याच्या अंगाचे मांस सुकून गेलें आहे; त्याचीं हार्डे, आणि रक्त- वाहिन्या हीं त्याच्या शरीरातून स्पष्टपणे दिसत आहेत; त्याचे केंस पांढरे झालेले असून त्याचे दांत पडले आहेत, आणि काठीच्या आधारावांचून त्यास चालतां येत नाहीं; तस्मात् असा हा कोण आहे ?
 सारथि - महाराज, हा एक वृद्ध मनुष्य आहे. याचें शरीर अशक्त झाले असून त्याची इंद्रिये कमकुवत झाली आहेत; तो आतां काम करण्यास पूर्णपणें असमर्थ झालेला असून दुसऱ्याच्या साह्यावरच आतां त्याचें पुढील सर्व जीवित अवलंबून आहे, आणि ज्याप्रमाणे वाळून गेलेल्या वृक्षाचा पशुपक्षी त्याग करितांत, त्याप्रमाणेच त्याच्या आत इष्ट मित्रांनीं त्याचा त्याग केला आहे.
 गौतम—हे सारथे, त्या मनुष्यास प्राप्त झालेली ही स्थिति व्यक्तिविष- · यक आहे, अथवा अशी स्थिति प्राप्त होणे, हा प्राणिधर्मच आहे, किंवा कसें,