Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४ )

आहे.) या घराण्याचा व मगध, विदेह, अंग, वगैरे राजघराण्यांचा निकटचा संबंध असून महावीरची आई त्रिशलाराणी ही विदेह देशाच्या राजाची कन्या होती; यावरून तिला वैदेही अथवा विदेहदत्ता असें म्हणत असत. या धर्मांच मुख्य तत्त्व " अहिंसा परमो धर्मः " हे असून जैनधर्मी लोक आपल्या धर्मसिद्धां- तांना वेदांचा जेवढा भाग अनुकूल वाटतो तेवढाच ग्राह्य मानितात. ते काळाचे तीन भाग मानितात. त्यांपैकी पहिल्यांत मागें होऊन गेलेले चोवीस, दुसऱ्यांत चालू असलेले चोवीस व तिसऱ्यांत पुढे होणारे चोवीस मिळून एकंदर बहात्तर 'जिन' म्हणजे ज्ञानी पुरुष अथवा तीर्थंकर मानन त्यांची ते भक्ति करितात. जैनधर्मात पूर्वी जे चोवीस तीर्थकर होऊन गेले ते सर्व क्षत्रिय असून त्यापैकी पहिला ऋषभदेव यासह बावीस तीर्थकर इक्ष्वाकू कुळांतील होते; आणि विसावा तीर्थकर मुक्त व बावीसावा तीर्थकर नेमीनाथ हे यदुकुलांतील होते. या सर्व तीर्थंकरांत महावीर हा शेवटचा आहे, त्यानें तीस वर्षे संसार करून पुढें बारा वर्षे तपश्चर्या केली, व तपश्चर्येअंतीं त्यास कैवल्या- बस्था जात होऊन त्यानें पुढें तीस वर्षेपर्यंत लोकांस उपदेश केला. अशा रीतीनें आपल्या वयाच्या ७२ व्या वर्षापर्यंत कालक्रमणा करून तो इ० सनापूर्वी ४९० मध्ये मृत्यु पावला. या सर्व सिद्ध पुरुषांचे पुतळे जैनधर्मियांच्या देवाल- यांत उभे केलेले असतात. अशा प्रकारची जैनधर्माची थोडक्यांत हकीकत आहे.

 या काळांत दुसऱ्या ज्या धर्माचा उदय झाला तो म्हणजे बौद्धधर्म होय. इ० सनाच्या पूर्वी सहाव्या शतकांमध्ये या धर्माचा उदय होऊन त्याच्या प्रसारास तुर. वात झाली. तथापि पहिल्या दोन शतकांत त्याचा फारसा प्रसार न होतां साम्राट् अशोक याच्या काळापासून त्या धर्माची अत्यंत भरभराट झाली. या धर्माचा संस्था- पक गौतम हा शाक्य या नांवाच्या क्षत्रिय कुलांतील असून कपिलवस्तु येथील राजा शुद्धोदन याचा हा मुलगा होता. याच्या आईचें नांव मायादेवी हैं। होतें हैं कपिल वस्तूचें राज्य कोसल व दक्षिण मगध या दोन बलाढ्य राज्यांच्या मधील प्रदेशांत काशीच्या उत्तरेस अजमासे शंभर मैलांपासून पुढे थेट हिमालयाच्या पायथ्यापर्यंत पसरलेलें होतें. राजा शुद्धोदन हा मोठा शूर असून आपणा- प्रमाणच आपला मुलगाही मोठा शूर व कीर्तिमान् निपजावा, अशी त्याची उस्कट इच्छा होती; परंतु गौतम हा नेहमी एकटाच बसून विचार मन स्थितीत असलेला त्याच्या दृष्टोत्पत्तीस येत असे; अशाच स्थितींत शुद्धोदनानें, यशोधरा