Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



(२१)

असे; शिवाय सर्व कारखान्यांवर देखरेख ठेवणे, सर्व प्रकारच्या मालावर, त्याच्या विक्री नंतर काहीं विविक्षित कर वसूल करणे, बाजार, बंदरें, देवळें, वगैरेंवर देखरेख ठेवणें वगैरे कामेही याच सुधाराई मंडळाकडे सोपविलेली असत. साम्राज्याचे प्रांतवार. अनेक सुभे केलेले असून प्रत्येक प्रांतावर एक एक स्वतंत्र सुभेदाराची नेमणूक करण्यांत येत असे; व त्यांच्या वरील तपासणी करितां दुसऱ्या स्वतंत्र अधिकाऱ्यांच्या योजना केलेल्या असून ते नेहमीं फिरते असत. सत्यप्रियता व प्रामाणिकपणा याबद्दल हिंदी लोकांचा त्या काळीं अती- शय लौकिक झाला होता. पाटबंधाऱ्याचे एक स्वतंत्र खातें ठेवण्यांत आलें होतें, ६ पाटपाण्याचा सर्वास सारखा फायदा मिळावा म्हणून वेळच्या वेळीं तें सोड- ण्याच्या व बंद करण्याच्या कामीं तें खातें फार सावधगिरी बाळगीत होतें; सारांश, या अलौकिक राज्यकर्त्यानें आपल्या प्रजेच्या उन्नतीकरितां अनेक प्रकारें अश्रांत परिश्रम केले, व त्यामुळेच हिंदुस्थानच्या इतिहासांत त्याचें नांव अजरामर झालें, असें म्हणण्यास हरकत नाहीं.
 याच चंद्रगुप्ताचा चाणक्य या नांवाचा एक अतीशय प्रसिद्ध व विद्वान् ब्राह्मण प्रधान होता. त्यानें 'चाणक्यनीति या नांवाचा एक राजनीतिपर ग्रंथ लिहिला असून त्याचे इंग्रजीतही भाषांतर झलेले आहे. चंद्रगुप्त हा इ. सनापूर्वी २९१ या वर्षी मृत्यु पावला, व त्याच्या मागून त्याचा मुलगा मित्र- गुप्त उर्फ बिंदुसार हा गादीवर आला. याच्या कारकीर्दीत -- कित्येकांच्या मतें चंद्रगुप्ताच्या कारकीर्दीत या मौर्य साम्राज्याची दक्षिण सरहद्द हल्लींच्या मद्रास शहरापर्यंत जाऊन भिडली होती. बिंदुसार हाही मोठा हुषार व कर्तृत्ववान् असून त्याने वीस वर्षे राज्य केलें; तो इ. सनापूर्वी २७२ या वर्षी मृत्यु पावला, व त्याचा महापराक्रमी व अत्यंत प्रसिद्ध मुलगा ' साम्राट् ' अशोक हा सिंहा- सनारूढ झाला. हा राज्यकर्ता मोठा शूर असून त्याने बंगालच्या उपसागरा वरील कलिंग देशाचे राज्य म्हणजे हल्ली ज्यास ओढ्या व सरकार असें म्हणतात तें-- हस्तगत करून आपल्या राज्यास जोडिलें, या काळात बौद्ध धर्माचा नुकताच कोठें उदय होऊ लागला होता, व बुद्धभिक्षु चोहोंकडे त्या धर्माचा उपदेश करून त्याची वृद्धि करण्याच्या प्रयत्नास लागले होते. या भिक्षु लोकांच्या उपदेशाचा राजा अशोक याच्या मनावर अतीशय परिणाम झाला व त्याने बौद्धधर्माचा अंगीकार केला. या राज्यकर्त्यानें