Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २० )

आपल्या प्रवासवृत्तांत विशद रीतीनें ग्रंथित केली आहे. या चंद्रगुप्तानें ग्राम- संस्थेप्रमाणेच एक स्वतंत्र युद्धसंस्था अथवा युद्धखातेंही निर्माण केले होते. या खात्यांत तीस सल्लागार अथवा मंत्री नेमिलेले असत; पंचायतीचे म्हणजे पांचजणाचे एक अशी या तोस मंत्र्यांची सहा मंडळे होती; त्यांपैकी पहिल्या मंडळाकडे आरमारी खातें सोपविलेले असून या मंडळाचा आरमारावरील मुख्य अधिकाऱ्याशीं संबंध असे. दुसऱ्या मंडळाकडे सैन्य, सैन्यवाइन याची जबाब- दारी सोपविलेली असे; आणि पायदळ, घोडदळें, युद्धरथ व हत्ती या युद्ध- विषयक चार बावतींची व्यवस्था बाकीच्या चार स्वतंत्र मंडळाकडे निरनिराळी सोपविलेली असे. युद्धखात्याप्रमाणेच त्यानें एक स्वतंत्र मुलकी खातें निर्माण करून त्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली असे; शिवाय त्यानें एक स्वतंत्र शहर सुधारणाखाते निर्माण केलेले असून त्या खात्यांतही युद्धखात्याप्रमाणेच तीस सभासदांची नेमणूक केलेली असे व त्याचींही सहा निरनिराळीं मंडळें असून या मंडळावरच राज्यांत कलाकौशल्याची वाढ करण्याची जबाबदारी टाकिलेली असे; शिवाय कामकरी लोकांच्या मजूरीचे बाबतीतील, व व्यापार व इतर उद्योगधंदे यांच्या संबंधांतील उत्पन्न होणाऱ्या हरएक प्रभाचा त्यांनीच अखे- रचा निवाडा यावा, असे ठरलेले असे. म्हणजे इतक्या प्राचीनकाळीही हिंदु- स्थानांतील चंद्रगुप्ताच्या राजसत्तेकडून प्रजेच्या हिताची, कल्याणाची, व प्रगतीची किती काळजी घेतली जात असे, याची स्पष्ट कल्पना वरील हकीकती- वरून सहज होण्यासारखी आहे इतकेंच नाहीं तर निरीक्षक दृष्टीनें या मंड- ळांच्या अधिकारव्यातीचें व कार्य क्षेत्राचे मनन करणें योग्य असून त्यामुळे नवी माहितीही मिळण्यासारखी आहे. याच मंडळाकडे परदेशांच्या वकिलांचीही व्यवस्था सोपविलेली होती, आणि व्हिन्सेंट स्मिथ याने म्हटल्याप्रमाणे सदर मंडळाचे अस्तित्व, ही गोष्ट, या साम्राज्याचे परकीय राज्याशीं अव्याहत दळण वळण असे, याची निदर्शक होती. शिवाय या मंडळाकडे जन्ममृत्यूची नोंध करण्याचे काम सोपविलेले होते, व ती विशेष काळजीने व दक्षतेने करण्यांत येत असून कर बसविण्याच्या अथवा कमी करण्याच्या प्रसंगी तिचा अतीशय उपयोग होत होता; त्याप्रमाणेच हे मंडळ व्यापाराकडे लक्ष्य पुरवीत असे; सरकारी शिक्क्याची नवीं वजने व मापें निश्चित करून व त्यासंबंधी नियम बांधून सर्व लोक त्यांचाच उपयोग करितील अशी खबरदारी घेण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच