Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९ )

त्याने हिंदुस्थानांतील पंजाब व सिंघ हे दोन्हींही प्रांत चंद्रगुप्तापासून परत ● मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांत त्यास अपयश येऊन हे दोन्हींहि प्रांत • चंद्रगुप्ताच्याच अमलाखालीं राहिले. चंद्रगुप्त हा अत्यंत कर्तृत्ववान् राज्य- कर्ता असून तो युद्ध व राज्यव्यवस्था ह्या दोन्हींही कलेत निष्णात होता. शिवाय तो विद्वानांचा मोठा भोक्ता असून मेगास्थनीस या नावांचा एक ग्रीक विद्वान् मनुष्य त्याच्या दरबारांत होता. त्याने चंद्रगुप्ताच्या राज्यव्यव स्थेचे बारकाईनें निरीक्षण करून त्यासंबंधींची मोठी मनोवेधक व मननीय हकीकत लिहून ठेविली आहे; तिचा अभिप्राय सारांशरूपानें सरविल्यम हंटर याने आपल्या ग्रंथांत नमूद केला आहे; तो असा कीं:- "हिंदुस्थानातील गुलामगिरीचा अभाव, स्त्रियांचे पातिव्रत्य आणि पुरुषांचा धीरोदात्त स्वभाव, यांचे मेगा स्तनीस याने मोठया कौतुकानें वर्णन केलेले आहे. शिवाय - मेगास्थनीस म्हणतो: “ आशिया खंडांतील इतर कोणत्याही लोकांपेक्षां हिंदी लोक शौर्यात श्रेष्ठ आहेत; त्यांना आपल्या घरांनां कुटुपे लावण्याची - कधींही आवश्यकता वाटली नाहीं; इतकेंच नव्हे तर खोटें योलणारा हिंदी मनुष्यही आपणाला कधींहि आढळून आला नाहीं. हिंदी लोक उद्योगी, आहारादिकांत फार नेमस्त, शेतींत वाकबगार व कलाकौशल्यांत तरबेज असे आहेत. न्यायमंदिराची पायरी चढण्याचा त्यांना क्वचितच प्रसंग येत असतो, व आपल्या एतद्देशीय राज्यकर्त्याच्या अमलाखालीं ते सुखानें रहात असतात.," थोडक्यांत म्हणजे मनुस्मृतीत वर्णन केलेलीच राज्यव्यवस्था जवळ जवळ या चंद्रगुप्ताच्या राज्यांत चालू होती, असें मेगास्थनीसाच्या वर्णनावरून दिसतें. तो पुढे म्हणतो :- “या वेळीं हिंदुस्थानांत निरनिराळीं एक अठरा राज्ये आहेत. व त्यांपकी काहीं तर चंद्रगुप्ताचे अमलाप्रमाणे आधिराज्याचे अधिकारही उपभोगीत आहेत." त्या प्रमाणेच 'ग्रामसंस्था' या संबंधीही त्याने केलेले वर्णन मोठें सुरस आहे; व ग्रामसंस्थेतील एक एक खेडेंही त्याला स्वतंत्र लोकसत्ताक राज्याप्रमाणे वाटत असून, लढाई ब नोकरी या दोन्हींही पेशापासून हिंदुस्थानांतील तत्कालीन वैश्य वर्ग अजिबात • मोकळा होता, ही गोष्ट ही त्याने नमूद केलेली आहे. त्याप्रमाणेच हिंदुस्था नांत उत्पन्न होणारे अनेक प्रकारचे रंग, तंतू, निरनिराळ्या प्रकारचं कापड व खनिज, प्राणिज व वनस्पतिज पदार्थ यांचीही माहिती त्याने