Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८)

सुमारास तो सुसाट येथें जाऊन पोहोंचला; आणि पुढे जात असतां आशिया मायनरमधील बाबीलोन या ठिकाणीं मृत्यु बावला. शिकंदर बादशहा हिंदुस्थानां- तून परत गेला त्यावेळीं त्यानें पंजाबमध्ये फिलिप या नांवाचा आपला एक ' गव्हर्नर ' अथवा सुभेदार नेमिला होता, व पराभूत केलेला राजा पौरस यास त्याच्या हाताखाली मुलकी कारभारी नेमिलें होतें. फिलीपचे व पौरसाचे सख्य होतें; परंतु फिलिपच्या मागाहून आलेला गव्हर्नर युडेमॉस व पौरस यांचे पर स्परांत अत्यंत वैमनस्य येऊन युडेमासनें पौरस याचा विश्वासघाताने खून केला. वेव्हा त्या प्रांतांतील लोकांनीं चंद्रमोरी उर्फ चंद्रगुप्त या नांवाच्या एका पराक्रमी व साहसी तरुणाच्या धुरीणत्व खालीं चंड उभारिलें, आणि या चंद्रगुप्ताने त्या प्रांतांतील ग्रीकसत्तेचा शेवट करून तेथे आपले राज्य स्थापन केलें.
 हा चंद्रमोरी अथवा चंद्रगुप्त हा या काळांतील हिंदुस्थानचा पहिला सार्वभौम राज्यकर्ता आहे असें मानण्यांत येतें; आणि सूर्यवंशांतील राज्यकर्ता श्रीरामचंद्र अथवा त्याचे बंधु यांच्या पासून उत्पन्न झालेल्या छत्तीस शाखां- पैकी ' प्रमार' नांवाच्या एका शाखेत त्याचा जन्म झाला होता, असे पुराणां- तील वंशवर्णनावरून सनजून येतें. चंद्रगुप्त हा मुळचा मगध देशांतील रहिवासी असून तेथे राज्य करीत असलेल्या नंदघराण्याशी. त्याचे दूरचे नातेंही होतें परंतु, राज्यविषयक खटपटीवरून, त्या घराण्या त्याचा वेबनाव झाल्या मुळे, तो मगधदेश सोडून आपला जीव बचावण्याकरितां ग्रीक लोकांच्या आश्रयास येऊन राहिला होता; पुढे ग्रीक लोकांची सत्ता नामशेष केल्यावर त्याने नंदघराण्याचा सूड उगविण्याकरितां मगध देशावर स्वारी केली, आणि इ० सनापूर्वी ३२१ या वर्षी मगध देशाचें राज्य आपल्या हस्तगत करून घेऊन मौर्य घराण्याची स्थापना केली. नंतर त्याने आपले सैन्य वाढवून पुष्कळ प्रदेश हस्तगत करून घेतला, आणि उत्तरेस हिंदुकुश पर्वतापासून नर्मदा नदी- पर्वत, व पूर्वेस अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत आपल्या राज्याची सरहद्द नेऊन निडविली, व या सर्व व्यापक प्रदे-शांचा तो सामंतच काधिपति बनला. या वेळी त्याच्या सैन्यांत रथ हत्ती, घोडेस्वार व पायदळ मिळून एकंदर ६ लक्ष ९० हजार सन्य जय्यत होतें. मध्यंतरी शिकंदर बादशहा मृत्यु पावल्यामुळे त्याचे आशिया खंडातील सर्व राज्य त्याचा सेनापति सेल्यूकस निकेटर याच्या ताब्यांत भाले; तेव्हां