Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७ )

इ० सनापूर्वी ५४० या वर्षी गादीवर आला व त्याने आपल्या राज्याची राज- धानी राजगृह येथे केली. याचा मुलगा अजातशत्रु हा मोठा शूर, पराक्रमी व वाडशी होता. हा, इराणचा राज्यकर्ता दारायस ( इ. सनापूर्वी ५२१-४८५) ना जवळजवळ समकालीन असून त्याने आपल्या बापास ठार मारून इ. सना पूर्वी ४९१ या वर्षी गादी मिळविली. हाच अजातशत्रु हा, हल्लीं पाटणा व बांकीपूर हीं शहरें ज्या स्थानी आहेत त्या जागेवर असलेले मगध देशाच्या राजधानीचे शहर पाटलीपुत्र, याचा संस्थापक होय. यानें कोसल व बेसाली ह्रीं प्रजासत्ताक राज्य जिंकिलीं : या काळांत इराणचा प्रसिद्ध बादशहा दारायस हाही मोठा पराक्रमी व योद्धा म्हणून नावाजलेला होता; व सिंध व पंजाब प्रांताचा कांहीं भाग त्याच्या तान्यति असून त्यावर त्याने एका हिंदुसुभेदाराची नेमणूक केली होती हा सुभेदार दारायसकडे दरवर्षी दीड कोट रुपये खंडणी रवाना करीत असे, आणि ती इतर कोणत्याही स्वरूपांत न जातां निव्वळ सुवर्णरूपानेच रवाना होत असे. इ. सनांपूर्वी ४५९ च्या सुमारास शिशुनाग- वंश नष्ट झाला, आणि मगधराज्य नंदघराण्याकडे गेलें; या घराण्यांतील शेव- टचा पुरुष राज्य करीत असतां बादशाहा शिकंदर याने इराणचे राज्य जिंकून हिंदुस्थानावर स्वारी केली, व इ० सनापूर्वी ३२६ च्या मार्च महिन्यांत हिंदु- कुश पर्वत ओलांडून, व अटकजवळ ओहिद येथे सिंधुनद उतरून, वाटेंतील राज्यकर्त्यांशीं झगडत झगडत तो हिंदुस्थानांत आला. शिकंदरानें सिंधु व झेलम या नद्यांमधील "देश सहज हस्तगत करून झेलम नदी ओलांडली; परंतु झेलम व चिनाब या नद्यांमधील प्रदेशांत पौरव घराण्यांतील राजा पोरस याने त्यास अडथळा केला. तेव्हा उभयतांमध्ये युद्ध होऊन त्यांत पौरस राजाचा पराभव झाला. नंतर तो काश्मीर प्रांतांत शियलकोटच्या पलीकडे पर्यंत गेला; परंतु त्याचे सैन्य पुढे जाण्यास नाखूष असून त्या सैन्यांत बंडाळी माजली; त्यामुळे त्याला आपला वर्षाच्या पुण्याचा बेत मोठ्या नाइलाजानें मोंडाबा लागून, तो त्याच सप्टेंबर महिन्यांत आपल्या सैन्यासह परत फिरला; त्या वेळी त्याने सिंध व पंजाब प्रांत हस्तगत करून तेथे आपले ग्रीक अधिकारी व सैन्य ठेविले; व इ० मध्यपूर्वी ३२५ च्या सप्टेंबर महिन्याच्या सुमारास त्यानं सिंधु-नदाच्या मार्गने हिंदूस्थानचा सरहद्द ओलांडली व ३२४ च्या मे महिन्याच्य