Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६ )

अथवा शिकंदर बादशाहा याने हिंदुस्थानावर स्वारी केलेली आहे. शिकंदराची ही स्वारी इ० सनापूर्वी ३२६ या वर्षीची आहे; तथापि त्याच्याहि पुष्कळच पूर्वी, म्हणजे इ सनापूर्वी २०३४ या वर्षी हिंदुस्थानावर परदेशीयांची स्वारी झालेली आहे. निनेवीच्या सेमिरामीस राणीने उभारलेला एक जयस्तंभ अलीकडे उपलब्ध झाला आहे; त्यावरून असे दिसते, कीं. तिनें इ० सना पूर्वी २०३४ या वर्षी हिंदुस्थानावर स्वारी केली होती, व ती सिंधुनद ओलांडून थेट काश्मीर जम्मूपर्यंत चाल करून गेली होती; परंतु डॉयोडोरस सिक्यूलस हा ज्याला स्ट्रानोबेट्स् असें नांव देतो त्या राज्यकर्त्याने तिच्याश युद्ध करून तिचा पराभव केला, आणि तिला हिंदुस्थानांतून परत जाणं भाग पाडिले. त्याप्रमाणेच इ० सनापूर्वी ९८१ या वर्षी दुसऱ्या रामेसीसने हिंदुस्था- नावर स्वारी केली असल्याचा उल्लेख आढळतो. हिंदुस्थानचा तत्कालीन व्यापारविषयक इतिहासही अशाच प्रकारचा असून इ० सनापूर्वी ९८० या वर्षी टायरचा हिराम हा अरबी समुद्रांतून व आखातांतून हिंदुस्थान देशाशीं व्यापार करीत असे, अशाबद्दल भरभक्कम पुरावा मिळतो. म्हणजे शिकंदराच्या काळापासूनच हिंदुस्थानच्या इतिहासास प्रारंभ होतो, हे कांहीं पाश्चात्य इति - हासकारांनी दिग्दर्शित केलेले मत वस्तुस्थितीस सोडून आहे, असे उघड होते.
 मागं वर्णन केलेल्या राज्यांत मगध या नांवाचे एक राज्य त्या काळीं अस्तित्वांत असल्याचे दिग्दर्शन केलेले आहेच. हे राज्य वाढत वाढत पुढें इतके बलिष्ठ बनले, कीं, त्याची सार्वभौम राज्यांत गणना होऊं लागली. हैं राज्य इ० सनापूर्वी ६०० च्या सुमारास शिशुनाग या नांवाच्या एका क्षत्रिय वंशाकडे होतं; शिवाय, सिंघाली दंतकथेप्रमाणे इ० सनापूर्वी ६२३ ते ५४३ या दरम्यान बुद्धदेवाच्या काळीं- ( इ० सन ४८७ मध्ये बुद्धदेवाचे प्रयाण झाले, असे व्हिन्सेंट स्मिथ यांचे मत आहे. ) हिंदुस्थानांत कोसल (अयोध्या) व मगध हे देश अतीशय भरभराटीस व प्रख्यातीस आलेले होते तथापि पहिल्यानें मगध देशाच्या मानानेंही कोसल देश अधिक महत्त्वास चढलेला होता; परंतु पुढे त्याचें तें महत्त्व लयास जाऊन त्याच्या जागी मगध देशाचे महत्त्व वाहून गेले; व मगध देशाचा विस्तार हिमालय पर्वतापासून तो थेट गंगानदीपर्यंत पसरला गेला. या शिशुनाग घराण्यांतील पांचवा पुरुष विंवसार हा मोठा शहाणा राज्यकर्ता होऊन गेला; तो