Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५ )

यन भाषेतील उपनिषदांचे भात्रातर पाहिले व त्यावरून त्याने त्यांचा फ्रेंच व ल्यादीन भाषेत तर्जुमा केला. त्यानंतर प्रसिद्ध तत्वज्ञानी शोपेन हेर यानें त्याचें मोठ्या बारकाईने परिक्षण केले, आणि उपनिषदामध्ये अत्यंत उदात्त व गंभीर विचारांचा संग्रह केलेला आहे असे जाहीर केले इतकेच नव्हे तर तत्त्वज्ञान या विषयावर त्याने पुढे जे ग्रंथ लिहिले, त्यातही उपनिषदांमधील उदाच तत्त्वें ग्रथित केली. अशा रीतीने ही भाषांतरें परन्थ लोकांच्या वाचनांत आल्याने, मूळ संस्कृत उपनिषदांत असलेले स्वारस्य आपणास समजून यावे म्हणून आर्य- लोकांची मूळ भाषा जी संस्कृत तिचा कांहीं पाधाय विद्वानांनी अभ्यास केला, व त्यामुळे पृथ्वीवरील बहुतेक सर्व सुधारलेल्या व प्रमुख भाषांत त्यांची भाषां- तेरे झाली. वरील विवेचनावरून, उपनिषदे हा आर्याच्या अलौकिक बुद्धि- वैभवाची द्योतक आहेत, त्यांची निरनिराळ्या भाषेत भाषांतरें व रूपांतरे झाल्या वेळेपासूनच परकीय लोक, आर्य लोकांचे बुझ्बिभव व ज्ञानसामर्थ्य, याबद्दल स्तुतिपर उद्गार काढू लागले आहेत, व त्यामुळेच हिंदुस्थानांतील या उदात्त प्राचीन वाङ्मयाकडे त्यांचे लक्ष वेधलं आहे, अशी कोणाचीही खात्री होईल.
 ब्राह्मणकाळास धर्मक्रांति-काळ असेही नाव देता येईल. कारण ब्राह्मण ग्रंथाची रचना झाली त्या काळी धार्मिक विधिव्यवहार क्रिया-कर्मांतरे व यज्ञयाग हवनादि कृत्ये, हीं अनंत पटीने वाढून व घोटाळ्याची होऊन साध्या वैदिक धर्मा विशेष कठिण स्वरूप प्राप्त झाले; आणि धर्मात जसजसे दुर्योध स्वरूप व काठिण्य येत गेलें, तवा धार्मिक कृत्ये करणारांचा एक स्वतंत्र वर्गच निर्माण करणें आवश्यक होऊन ब्राह्मणवर्ग अस्तित्वांत आला, उपनिषद्काला पूर्वी क्षत्रिय व वैश्व हे दोन्हींही वर्ग आपापली धार्मिक कृत्ये थोड्या फार प्रमाणानें स्वतःच करीत असत; परंतु त्या नंतरच्या कालापासून त्यांनी या स्वतंत्र वर्गाी- कडेच आपापली धार्मिक कृत्ये तोपविली. हा ब्राह्मणकाळ साधारणतः ५० सना पूर्वी ५०० या वर्षापर्यंत गणिलेला असून त्यानंतर बौद्ध काल' सुरू झाला आहे.
 हिंदुस्थानच्या इतिहासांत, बौद्ध काल हा, धार्मिकच फक्त नव्हे तर राजकीय दृष्ट्याही अतीशय महत्त्वाचा म्हणून गणला गेलेला आहे; कारण याच कालांत धार्मिक व राजकीय क्रांति घडून आलेली असून ग्रीस देशांतील मासिडोनिया प्रांताचा राज्यकर्ता अलेक्झांडर भी ग्रेट