Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४ )

म्हणजे वेदांचे प्रामाण्य, हॅ असून श्रुति, स्मृति, आणि पुराणे, यांमधून ज्या धर्माचें प्रतिपादन केलेले आहे, तो हिंदुधर्म असें मानण्यांत आलेले आहे. प्रथमतः आर्यलोकांच्या देवता पंचभूतात्मक होत्या; आणि ते आकाश (द्यौः), वरुण ( आकाश विशेषतः रात्र ), मित्र ( सूर्य, दिवस, ), इंद्र ( पर्जन्याचा राजा ) वायु, व अग्नि यांची आराधना करोत असत; म्हणजे 'ऋग्वेद' च हिंदुधर्माचे मूळ असून तो वरील देवतांची स्तुति व प्रार्थना वैगेरेंच्या एकीकरणा- पासून निर्माण झालेला आहे.
 ऋग्वेदांत एकंदर दहा मंडले आहेत; त्यांपैकी पहिले व शेवट मंडल अनेक ऋषींनी रचिलेले असून दुसरें भृगु घराण्यांतील गृत्समद यानें रचि- लेले आहे; तिसरें विश्वामित्रानें, चवथें वामदेवानें, पांचवें अत्रीनें, सहावें भारद्वा- जानें, सातवें वसिष्ठानें, आठवें कण्वानें व नववें अंगिरसानें, रचिलेले आहे. उपनिषदे ही तत्कालीन आर्यांची पूर्ण संस्कृति, आणि त्यांची श्रेष्ठतम बुद्धिमत्ता यांची दर्शक असून पाश्चात्य देशांतील विद्वान् लोकांनीही आपापल्या ग्रंथांतून त्यांची अतीशय स्तुति केलेली आहे; आणि प्रोफेसर मॅक्स मुलर यानें तर आ- पल्या उपनिषदांवरील ग्रंथाच्या प्रस्तावनेत “उपनिषदांवरून संस्कृत भाषे- विषयींच्या माझ्या प्रेमास उतेजन मिळाले " अशी आपली स्पष्ट कबुली दिलेली आहे. उपनिषदे म्हणजे, वेदांत, वेदांतर्गत तत्त्वज्ञान, अथवा अज्ञानाचा नाश करणाऱ्या विचारांचा ग्रंथ होय; या ग्रंथांतील प्रमेयें व विचार अत्यंत उदात्त, प्रगल्भ व गहन आहेत. प्रसिद्ध मोंगल बादशहा शहाजहान याचा पहिला मुलगा दाराशेखो (जन्म अजमीर येथे इ० सन १६१५, मृत्यु इ. सन १६५९ ) हा मोठा बुद्धिमान, परधर्मसहिष्णु, उदार आणि थोर मनाचा असून धर्मशास्त्र, व तत्त्वज्ञान, यांचाही त्यानें अभ्यास केला होता, आणि एक फ्रेंच धर्मपदेशक व एक हिंदु साधु, असे त्याचे दोन गुरू होते. दाराशेखो हा इ० सन १६४० या वर्षी काश्मीर येथे असतां हिंदूच्या या उपनिषदांची कीर्ति त्याच्या कानावर गेली; तेव्हां तिकडून दिल्ली येथे परत गेल्यावर त्यानें काशीहून विद्वान् शास्त्री व पंडित मंडळी आणवून त्यांच्या देखरेखी खालीं उपनिषदांची पर्शियन अथवा उर्दू भाषेत भाषांतरे करण्यास प्रारंभ केला व तीं सर्व इ सन १६५७ मध्ये पूर्ण झाली. त्यानंतर पारशी लोकांच्या 'झँदावेस्ता' या नांवाच्या धर्मग्रंथाचा संशोधक प्रसिद्ध प्रवासी अॅकॅटील ड्युपेरों यानें इ० सन १७७५ मध्ये हे पर्शि