Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३ )

हा सर्व ग्रन्थसमूह पूर्णपणे लक्षांत ठेवून त्याप्रमाणे आचरण करणे दुरापास्त होऊन गेलें ; म्हणून त्रोटक पण पुष्कळ अर्थ समाविष्ट करणारी आणि लक्षांत ठेवितां येण्यासारखी मुलभ वाक्यरचना करण्यांत आली व त्यांना 'सूत्रे' असे नांव देण्यांत आलें. तथापि ह्रीं सूत्रेही निरनिराळ्या धार्मिक व सामाजिक बंब- नाच असल्यामुळे त्यांचे पुन्हां श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे, व धर्मसूत्रे, असे तीन भाग पाडण्यात आले; व त्यांतील श्रौतसूत्रांत यज्ञयागादि बाबतींतील नियम निर्बंध, गृह्य. सूत्रांत कौटुंबिक विधीच्या बाबतींतील नियम निर्बंध, व धर्मसूत्रात सामाजिक बाब- तीतील नियम-निर्बंध ग्रंथित करण्यांत आले; परंतु हीं सूत्रही पुढे अपूर्ण भासूं लागली; म्हणून व्याकरण, न्याय, वेदांत, वगैरे सूत्रग्रंथ निर्माण करण्यांत आले. त्यानंतर, या सूत्रांतील नियम-निर्बंधांवरून अनेक ऋषींनीं या बाबतींवरील 'स्मृति' ग्रंथ तयार केले असून त्यांतील मनु, पाराशर, व याज्ञवल्क्य, वगैरे ऋपिवृंदानीं केलेल्या स्मृति विशेष प्रगल्भ, माननीय, व महत्त्वाच्या म्हणून गणल्या गेल्या आहेत. पुढे वेदांतील इंद्र, वरुण, वायु, सूर्य, उपा वगैरे निरनिराळ्या देवतांच्या द्वारे सृष्टिक्रम चालला नसून मूळ आदिकारण शक्ति निराळी असावी असे मत उत्पन्न होऊन अनेकैश्वर मत मागें पडलें, एकेश्वरी मताची स्थापना होऊन उत्पत्ति, स्थिति, व लय, ही सृष्टिची बडामोड करणारा परमेश्वर एकच आहे, अशा मताचा प्रसार झाला; आणि वेदांतील अनेक देवतांऐवजी ब्रह्मा, विष्णु, व महेश, ह्या एकाच ईश्वराच्या तीन निरनिराळ्या विभूति व रूपें आहेत, असें मानून आर्य लोक त्यांनां भजूं लागले. अशा रीतीनें आर्य लोकांच्या, निरनिरा- ळ्या देवतांसंबंधींच्या वेदांतील पूर्वकल्पनांना व अनेकैश्वरी सांप्रदायाला निराळे वळण मिळाले, व ईश्वर एकच आहे, हें तत्त्व या वेळेपासून प्रचारांत आल.
 प्राचीन असीरिया, इराण, व इजिप्त, या देशांप्रमाणेच, हिंदुस्थान देशांतही हजारों वर्षांपासूनची संस्कृति आज तागायत विद्यमान असून तिचें मूळ 'ऋग्वेद' हा अमूल्य ग्रंथ अहे, असे म्हणण्यास हरकत नाहीं. हिंदुस्थानांतील ही संस्कृति ऋग्वेदानंतरच्या महाभारत, रामायण, भागवत, वगैरे ग्रंथांवरून, व इतर कार्ये, नाटके, व दंतकथा, यांवरून दृग्गोचर होत असून याच वाङ्मयावर व इतिहासा- वर त्या काळात हिंदुस्थानचें राष्ट्र आर्य लोकांनीं उभारिलेले आहे; हिंदुस्था- नांतील ' ग्रामपंचायती' सारख्या अनेक उपयुक्त संस्था पौराणिक कालापासूनच उत्पन्न होऊन त्या परंपरागत आलेल्या आहेत, आणि हिंदुधर्माचें मुख्य लक्षण