Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२ )

उपयोगांत आणावयाचीं सुत्तें, व अशा प्रसंगी निरनिराळ्या विद्वान् लोकांमध्यें वादविवाद होऊन जे विवेचन व निर्णय ठरले, त्यांचा भावार्थ, यांचा समावेश करण्यांत आला. दुसरा म्हणजे ' सामवेद' हा गाण्याच्या सुरांत बसविलेला असून तो यज्ञयागादि प्रसंगी म्हणण्यांत यावा असें ठरलें.

 वर लिहिल्याप्रमाणे वेदाचे हे तीन भाग असून त्यांना 'त्रयीविद्या' है संक्षिप्त नाव दिलेले आहे. याशिवाय 'अथर्व या नांवाचा एक चवथा वेद 'तो ऋग्वेदांतील शेवटची सूत्रे व कालांतराने त्यांत ग्रथित करण्यांत आलेली का, मिळून बनलेला आहे; या कालांत यज्ञयागादि कृत्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते; यज्ञादि प्रसंग विद्वान् मंडळी एकत्र जमून यज्ञ विषयक बाबीवर, व इतर गहन अशा धार्मिक विषयावर वादविवाद करीत होते; यज्ञांतील सर्व धार्मिक कृत्ये सुरळीत पणे व ठरीव नियम-निर्बंध यांनीं पूर्णतेस नेता यावी, म्हणून निरनिराळ्या कृत्यांवर स्वतंत्र निरनिराळे अधिकारी नेमण्यात येत होते; आणि यज्ञकृत्यांमधील बाबतीत मतभेद उत्पन्न झाल्यास त्याचा अखेरचा निर्णय देण्याकरिता 'ब्रह्मा' या नांवाचा एक स्वतंत्र अधि- कारी अथवा उपाध्याय निश्चित करण्यांत येत होता; परंतु असे यज्ञविधि व कृत्ये नेहमीच चालत राहिल्यामुळे असे वादविवादही हरहमेष होत राहिले. व त्यांचे निर्णयही पुष्कळच सांचून राहिले; तेव्हां हे वादविवाद व त्यांचे निर्णय एकत्र करणे आवश्यक झाले व त्यांचा 'ब्राह्मण' या नांवाचा एक ग्रंथ निर्माण करण्यात आला. त्यानंतर, वेदांतील कांहीं भाग गहन असल्यामुळे त्यांचा वादविवाद करितांना एकात ठेवणे आवश्यक बाहूं लागलें; म्हणून ' ब्राह्मण ' या ग्रन्थांतूनच 'आरण्यक म्हणून निराळा भाग काढण्यांत आला. तथापि त्यांतही पुन्हा सृष्टीची रचना उत्पत्ती, स्थिती, व लय, हो सृष्टींतील घडामोड, व असेच दुसरे गहन ईश्वरनिर्मित सिद्धांत, याविषयीं खल व वादविवाद झाला; व त्यावरून वेदाचे सार म्हणून 'उपनिषदे तयार करण्यांत आली. म्हणजे ऋग्वेद संहिता, त्यांतून निर्माण झालेले यजुर्वेद, सामवेद व अथर्व वेद, आणि वेदांतूनच निर्माण केलेले 'ब्राह्मण, आरण्यकें, व उपनिषदें, या सर्वांना मिळून श्रुति किंवा वेद अशी संज्ञा प्राप्त झाली.
 वरील विवेचनावरून हे लक्षात येईल कीं, ब्राह्मणकालांत आर्यांचा धार्मिक ग्रंथ विस्तार पुष्कळच मोठा, पाल्हाळिक व अवजड झाला, त्यामुळे