Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११ )

सुरस कथा महाभारतांत व भागवतांत वर्णन केलेली आहे. चेदी देश म्हणजे जबलपूर व बिलासपूर यांच्या सभोवतालचा प्रदेश, हा असून त्याच्या दक्षिणेस नर्मदा नदीच्या दोन्ही बाजूंस एक राज्य होते. त्यापैकी निषध हें दक्षिण माळव्यांत असून तेथे नल या नांवाचा एक प्रसिद्ध राज्यकर्ता होता व दुसरें विदर्भ म्हणजे वऱ्हाड देशावें राज्य असून तेथे भीम या नांवाचा राजा राज्य करीत होता. त्यास दमयंती या नांवाची एक कन्या असून, निषध देशाचा राजा नल याचेबरोबर तिचा विवाह झाला होता: यासंबंधीचीही मोठी मनोरंजक कथा ' नलोपाख्यान' नामक काव्यांत वर्णन केलेली आहे.
 या ब्राह्मणकालांत राजसत्तेचं जसें रूपांतर झाले, त्याप्रमाणेच ते वर्ण- व्यवस्थेतही घडून आले, व आर्यांचे चार वर्ण पृथकू बनले. त्यापैकी 'ब्राह्मण' हे इतर सर्व म्हणजे बाकीच्या तिन्हीही वर्णोच्या मानाने विद्येत अधिक होते; व यज्ञयागादि धार्मिक कृत्ये करून ईश्वरभक्ति व आराधना करण्याचे काम त्यांच्याकडे होतें; त्यामुळे ते आपणांस इतर सर्व वर्णाहून श्रेष्ट मानूं लागले, व इतर वर्णही त्यांना तसे मानूं लागले, क्षत्रिय वर्गाने इतर वर्णाचे संरक्षण व सांभाळ करण्याचे कर्तव्य स्वीकारले होते. त्यामुळे तो वर्गही अधिकार संपन्न व श्रेष्ठ गणला गेला आणि क्षत्रिय राज्यकर्त्यांच्या आश्रयास ब्राह्मणवर्ग 'कुल- गुरु' म्हणून राहू लागल्यामुळे राज्यकर्त्याकडून त्या वर्गाला विशेष मान मिळू लागला, व ओघाओघानेच बाकीच्या दोन्ही वर्गातही त्यांचे महत्त्व प्रस्थापित होऊन तें वृद्धिंगत झाले. अशा रीतीनें वर्णभेद उत्पन्न झाल्याबरोर रोटी-बेटी- व्यवहारासंबंधी नियम निर्बंध निर्माण झाले, आणि चारीही वर्ण त्याप्रमाणे आपापले सामाजिक व्यवहार स्वतंत्र रीत्या आवरू लागले. तथापि हे नियम निर्बंध ब्राह्मण व क्षत्रिय यांनी जितक्या कडक रीतीनें अमलांत आणले, तितक्या कडक रीतीने ते खालील दोन वर्षांनी अमलांत आणिले नाहींत: त्यामुळे हिंदु ले. कांत अनेक जाती निर्माण झाल्या; त्याप्रमाणेच, याच कालांत धार्मिक वावी व विधियांमध्येही स्थित्यंतर घडून आले. आर्याचा मुळचा अति प्राचीन ग्रंथ म्हणजे फक्त ' ऋग्वेद संहिता' हा होय; परंतु हा ग्रंथ अतीशय मोठा असल्याने त्याचे यावेळीं तीन भाग अथवा खंड पाडण्यात आले. त्यांत 'यजुर्वेद' हा पहिला असून त्यांतील ऋचांचा उपयोग केवळ यज्ञकृत्यांच्या संबंधापुरताच करावयाचा असे ठरविण्यांत भाले; व त्यांत, यज्ञयागादिप्रसंग