Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १० )

करणारास त्यांत पुष्कळच मौल्यवान् व विश्वास ठेवण्यायोग्य, अशी ऐतिहासिक माहिती मिळालेली आहे. उदाहरणार्थ विष्णुपुराणांत मौर्यवंशाच्या इति-हासांचे स्थूल वर्णन दिलेले असून तें बहुतांशी सत्य असल्याचे ठरले आहे.. त्याप्रमाणेच रेडक्लिफच्या मत्स्यपुराणाच्या प्रतीत दिलेला आंध्रराज्य- कर्त्याचा इतिहासही विश्वसनीय आहे, आणि अलीकडे सांपडलेली नाणीं व शिलालेख वगैरे वरून मत्स्य पुराणांतील आंत्रराज्यकर्त्याच्या वंशाव ळीच्या खरेपणाबद्दल तर मोठा विलक्षण असाच पुरावा उपलब्ध झालेला आहे." या कालांत आर्यावर्तत निरनिराळी घराणी राज्य करीत होती; त्यांपैकी पांचाल घराणें आग्रा व संयुक्त प्रांत या ठिकाणीं राज्य करीत असून, कान्य- कुब्ज ऊर्फ कनोज, कौशांबी व मथुरा, शहरे त्या राज्याची निरनिराळ्या काळीं राजधानीची ठिकाणे होतीं. मथुरा येथे राजा श्रीकृष्ण हा राज्य करीत असून, पुराणांतरी जे बारा अवतार वर्णन केलेले आहेत, त्यांतील हा आठवा व श्रीविष्णूचा अवतार आहे. असं मानितात या राज्याला लागून पूर्व बाजूस 'कोसल' या नांवाचें राज्य अयोध्या प्रांतात होते; त्याची राजधानी । अयोध्या है शहर असून राजा दारथ व श्रीरामचंद्र हे तेथील राज्यकर्ते होते; श्रीरामचंद्र हा सातवा अवतार हाणून मानिला गेलेला असून या राजकर्त्याच्या चरित्रावरूनच रामायणाची सुरस व चित्तवेधक कथा रचण्यात आलेली आहे; व त्यांत श्रीरामचंद्राने दक्षिण हिंदुस्थानांत दिग्विजय करीत जाऊन शेवटीं लंकेचा अनार्य राज्यकर्ता रावण यास ठार मारून ते बेट घेतल्याची हकीकत लिहिलेली आहे. कोशल देशाच्या पूर्वेस उत्तर बहार प्रांतामध्ये विदेह व दक्षिण बहार प्रांतामध्ये मगध अशी दोन राज्ये होती: त्यांत विदेह देशांत जनक या नांवाचा एक प्रसिद्ध राजा राज्य करीत होता; त्यास सीता या नांवाची एक कन्या असून ती श्रीरामचंद्रास दिलेली होती. याच स्त्रीचे रावणाने हरण केले असून रावणाचा वध करून श्रीरामचंद्राने तिला परत सोडवून आणिलें: त्यामुळे 'रामायण या कथेंतील मुख्य नायिका 'श्री सीतादेवी' ही मान- ण्यात आली आहे. मगध देशांत 'शिशुनाग या नांवाचे घराणे राज्य करीत होते है धणे पुढे विशेष प्रसिद्धीस आले, व मगध देशाचे राज्यहि तसेंच बलाढ्य झाले. मगध देशाला लागूनच 'चेदी' या नांवाचें एक राज्य होते, व त्या राज्यावर जरासंध या नांवाचा एक राजा राज्य करीत असून त्यासंबंधींची