Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९ )

झाली. याच कालांत राज्यकर्त्याच्या अधिकाराची मर्यादाही अधिक व्यापक झाली. वेदकालांत राज्यकत्यांस युद्धप्रसंगी स्वतः सेनानायक बनून युद्ध करणे, व जातींतील सार्वजनिक बाबतींचा योग्य निर्णय करणे, एवढाच अधिकार असे; परंतु ब्राह्मण कालांत राज्यकर्त हे जमिनीचे मालक बनले; त्यांचीं प्रथम लहान लहान राज्य निर्माण झाली; व पुढे त्यांचीच मोठमोठाली राज्य बनून सार्व- भौम राज्य झाली, वयाच्या राज्यकर्त्यांना 'महाराज' ही संज्ञा प्राप्त झाली. पुढे आपलं सार्वभौमत्व अथवा सामंतचक्राचिपतित्व सर्वमान्य करण्याकरितां अश्वमेध यज्ञ करण्याची पद्धत सुरू झाली. सिस्ती शकापूर्वी दुसन्या शतकांत पुष्यमित्रानें असा अश्वमेध यज्ञ केला होता; त्याप्रमाणेच हजारों वर्षांपूर्वीच्या सगराच्या कथेवरून इ. सनापूर्वी तीन हजार वर्षांच्या युधिष्ठिराच्या कथेवरून, ख्रिस्ती शकानंतर सातव्या शतकांतील आदित्यतेनाच्या कथेवरून, आणि रामायणांतील श्रीरामचंद्रांच्या कथेवरून त्या त्या पुरुषांनी आपले सार्वभौमत्व सर्वमान्य होण्याकरितां असे अश्वमेध यज्ञ केले होते, असे आढळून येतें. त्या काळी हिंदुस्थानात नर्मदा नदीपर्यंत मोळा राज्य विद्यमान होतीं; या राज्याच्या सरहद्दी मोठमोठाली अरण्य व ओसाड प्रदेश यांनीं विभक्त झालेल्या होत्या; व त्यांतील काहीं राजसनाक, व कांहीं शिष्टजन व लोकजनसत्ताक अशी होती; हिंदुस्थान देशाचे मूळ नांव जंबूद्वीप है असून अशोकास 'जंबूद्वीपचा राजा असे म्हणत. हा देश आयचि राहण्याचे ठिकाण म्हणून त्याचे नांव व भरतकुळावरून भारत वर्ष असे नांव त्यास प्राप्त झालेले आहे; म्हणजे हिंदुस्थान है या देवाचें मुळचे नाव नसून ते परकीय खाया करणायांनी त्यास दिलेले आहे; आर्य ऋषांनी रचिलेल्या वेदांतील ऋचांतून व ईश्वरप्रार्थनेच्या स्तोत्रांतून दक्षिणेच्या अलीकडील मोठमोठ्या नद्यांचा निर्देश केलेला आहे; पुढें आर्यलोक हे जसजसे दक्षिण दिशेकडे पसरू लागले, तसातसा दक्षिण दिशेकडील नद्यांचाहि त्यांत उल्लेख आलेला आहे. आर्याच्या पुराणांतील या माहितीसंबंधाने प्रसिद्ध इतिहासकार मि. व्हिन्सेंट स्मिथ यानें आपला हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास (पान १०, इ. सन १९०८ ) या पुस्त- कांत असे लिहिले आहे कीं, " 'पुराणांतून दिलेल्या वंशावळी फारशा भरवशा लायक नाहीत, अशा मताकडे कित्येक आधुनिक लेखकांचा कल असल्याचे निदर्शनास येते; परंतु तो न्याय नव्हे; कारण या पुराणाचे सूक्ष्मपणे अध्ययन