Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २७० )

Dependenoies हे पुस्तक पहा. त्याप्रमाणेच हिंदु, व हिंदवासियां संबंधीं पुष्कळ बाबतींत- म्हणजे त्यांचें शौर्य, साहस, पराक्रम, देशाभिमान, पावित्र्य, स्वामिनिष्टा, इमानी वागणूक, शोधक बुद्धि, शुद्ध आचरण, नैतिक बंधनांचे पालन, त्यांनी घडविलेल्या निरनिराळ्या राजकीय घटना, ग्रामपंचायती, व शहर मुधराई वगैरे सारख्या लोकोपयोगी संस्था, वांग्मय ज्ञान, तत्वज्ञान, वैद्य- शास्त्र, ज्योतिषशास्त्र, न्याय, नीती, गणित व व्याकरण शास्त्र युद्धशास्त्र, गायन- वादनशास्त्र, कलाकौशल्य व शिल्पशास्त्र, रंगित व विणकार्मे, व्यापार व वसा- हती विषयक प्राविण्य, वगैरे अनेक बाबतींत-भजून पुष्कळच उपयुक्त माहिती देतां येण्यासारखी आहे; परंतु स्थलाभावामुळे, आणि हिंदुस्थान देशाची मुखल- मान अमलापर्यंतच्या पूर्वकाळाची योग्य माहिती होण्यास वर दिलेली एकंदर हकीकत पुरेशी असल्यामुळे, वर दिग्दर्शित केलेल्या अनेक बाबतींचे या ठिकाण अधिक विवेचन केले नाहीं.
 तथापि वर ग्रंथित केलेल्या एकंदर माहितीवरून हिंदूलोकांच्या अंगांतील कर्तृत्वशक्ति, करामत, व कर्तबगारी, या बद्दल कोणासही सहज खात्री पटल्या वांचून राहाणार नाही. याच हिंदू लोकांपैकी " मराठे " हे एक आहेत; याच " मराठा" लोकां मध्ये प्रारंभी शिवाजी या नावानें- व पुढे छत्रपती शिवाजी महाराज या नामाभिधानानें ओळखली जाणारी, अत्यंत उज्वल, अत्यंत कीर्ति- मान, अत्यंत पवित्र, व अत्यंत चिरस्मरणीय, अशी एक अत्यंत अलौकिक विभूती निर्माण झाली; जगांतील अत्यंत प्रतापशाली व महाराष्ट्रांतील अत्यंत दैदिप्यमान असा हा भूलोकीचा तारा, माता जिजाबाई हिच्या पोटीं नवमास पूर्ण होऊन सुरक्षितपणे जन्मास आला; गोब्राम्हण प्रतिपालक व महाराष्ट्र धर्म संर क्षक असा हा बालरबी, राजे शहाजी याचा मुलगा शिवबा, शिवनेरीच्या किल्ल्यांत उदयास आला; महाराष्ट्र देश उद्धारक व स्वराज्यस्थापकं शिवराय मावळ प्रांतांत, मवाळ दिसणाऱ्या लोकांत व मावळे मंडळींत वाढीस लागला; मराठा तितुका मेळवावा " या समर्थाच्या सांप्रदायिक सवालाला, आपल्या सर्भवतीं मराठा मंडळ जमवून, कृतीनें तोडीसतोड असें उत्तर देऊन, सर्व महाराष्ट्रियांनां राजकीय व धार्मिक स्वातंत्र्य मिळवून देणारा हा बालवीर शिरोरत्न शिवाजी त्या नंतर मावळ प्रांतांतच राज्य संस्थापनेच्या पूर्व उद्योगास लागला; याच छत्र-