Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २७१ )

पति शिवाजी महाराजानें, नंतर दख्बन मध्ये " मराठा राज्य " जन्मास आणून तें अर्भक आपण निजधामास जाते समय, त्याची काळजीनें प्राणा पलीकडे जोपासना करून तें जोमानें वाढीस लावण्या करितां, मराठा मंडळाच्या ओटींत घातलें; याच अर्भकास, मराठा मंडळानें, त्याची प्राणापलीकडे जोपासना करून व त्यास वाढीस लावून, सतेज असा राष्ट्र पुरुष बनविले; याच मराठा मंडळाने पुढील काळांत दवनच्या घोड्यास सिंधू नदाचे पाणी पाजून अटकेवर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकविला; याच मराठा मंडळानें, राजकीय रंगभूमीवर वर्चस्वाचे बक्षीस मिळविण्याकरितां, पुढे आलेल्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला आपली पूर्णपणे ओळख करून दिली आहे; याच मराठा मंडळानें, हैद्राबादकर निझाम, म्हैसूरकर, हैदर अल्लीं व टिपु सुलतान, बंगाल व औध, येथील नबाब, गोंवेकर पोर्तुगीज, चंद्र- नगरकर फ्रेंच, मुंबई, मद्रास व कलकत्तेकर इंग्रज, वगैरे सत्ताधाऱ्यांना आपल्या अस्तित्वाची पूर्ण जाणीव करून दिलेली आहे; याच मराठा मंडळानें जाट व रजपूत यांच्याकडून आपले हक वसूल करून, रोहिलखंडास शह देऊन तें आपल्या संरक्षक हक्काच्या कक्षेस आणिले आहे; याच मराठा मंडाळानें, याच मराठ्यांच्या सैन्याने, व शत्रानें, दिल्ली काबीज करून व तात्र्यांत ठेवून तेथील सिंहासनावर-दिल्लीपतीच्या तख्तावर, बादशहा शहाअलभ यांस स्थानापन्न केले आहे; आणि तरबारीस तोफांचे पाठबळ देऊन त्याचा व त्याच्या तख्ताचा कांहीं काळपर्यंत सांभाळ केलेला आहे. याच मराठा मंडळानें "मराठ्यांचा वशिला” ही अजब चीज एके काळीं किर्ती महाग होती है हिंदुस्थानातील राजेरजवाड्यांच्या व सत्ताधीशांच्या अनुभवास आणून दिलेले आहे; आणि याच मराठा मंडळाने जतन करून बाढीस लावलेल्या महाराष्ट्रांतील मराठी राज्याच्या कोवळचा, लहान, व रोडक्या रोपातूनच “ मराठा साम्राज्य " रुपाँ, विस्तीर्ण व प्रचंड वृक्ष बनून, त्याचा हिंदुस्थानांत दशदिशा विस्तार झाला आहे. जगांतील कोणत्यादी साम्राज्याच्या राज्याच्या संस्थानाच्या, अथवा संस्था, किंवा मंडळाच्या, अकल्पनातित भरभराटीचे व उत्कर्षाचे असे योगायोग कचितच जुळून येत असल्यामुळे, आणि शिवाजीची कैद, संभाजीचा मृत्यू, पानिपत येथील पराभव, नारायणरावाचा मृत्यू, अशा एका मागून एक प्राण घातक आपत्तों मराठ्यांवर सारख्या कोसळत गेल्यानें