Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६९ )

बनले; परंतु व्यापार, अधिकार, व संपत्ति, या त्रयीं बरोबर युरोपियन राष्ट्र सर्व गुणसंपन्न चनलीं, असें मात्र म्हणतां यात्रयाचें नाहीं; एखाद्या राष्ट्रांत पिढयानुपिढ्या अस लेले अनेक अमोल्प सद्गुण, तें राष्ट्र जिंकले गेल्या नंतर लोपून जातात, आणि अशा जित राष्ट्रांतील लोकांचें जेत्यावर तेज न पडतां जगाच्या राष्ट्रीय इतिहासांत तें राष्ट्र नामशेष व निस्तेज स्थितींत जिवंत राहते, असा सर्व साधारण नियम आहे; परंतु त्यासही अपवाद आहे; आणि तो अपवाद म्हणून "हिंदुस्थान " या देशांकडे बोट दाखवितां येण्यासारखे आहे. आजपर्यंतच्या अनेक शतकांच्या निरनिराळ्या परिस्थिति व क्रांत्या या मधून, हिंदूधर्म, हिंदू संस्कृति, हिंदू शील, व हिंदू कर्तृत्व शक्ति, आजही सुरक्षितपणे बचावून जगाच्या इतिहासांत प्रमुख त्वानें झळकत आहे. “मोगल राष्ट्राचा -हास होण्याच्या वेळीं जर युरोपियन लोक हिंदुस्थानच्या रणक्षेत्रांत मध्ये ढवळा ढवळ करण्यास नसते तर सर्व दक्षिण आणि मध्य हिंदुस्थानचे मालक " मराठे " हेच झाले असते, " असे लायल साहेबाचे म्हणणे आहे; ( Lyall's British Dominion in India हैं पुस्तक पहा.) मरा- ठ्यांना एक छत्री साम्राज्य म्हणजे काय माहीत होतें; आणि व्हिन्सेंट स्मिथनें आपल्या इतिहासांत (Early History of India) म्हटल्या प्रमाणे हिंदू लोकांनां एकछत्री साम्राज्याची पूर्ण ओळख होती; मुसलमानांच्या पूर्वी हा देश पूर्णपणे हिंदू- च्याच ताव्यांत होता, आणि आज साधारण जेवढ्या भागावर इंग्रजी अंमल चालत आहे, तेवढ्याच भागावर जवळ जवळ पूर्वी हिंदूंचीच सत्ता चालत होती; त्या प्रमाणेच इ० सन १९१७ या वर्षी लंडन येथें रॉयल एशियाटिक सोसायटी पुढे सर हरबर्ट रिस्ले यानें, सर हेनरी सम्बर मेन याचा आधार घेऊन अर्से भाषण केलें कीं, “राष्ट्रियत्वाची कल्पना,” ही मूळ हिंदुस्थानांतच उगम पावलेली आहे, व नंतर ती पश्चिमेकडे गेलेली आहे. राजकीय एकीकरण हें तीन मूलभूत तत्वाच दृश स्वरूप आहे. आणि ब्रिटिश लोकांना हिंदुस्थानात जे यश मिळाले, त्याहून जर यदा- कदाचित कमी यश मिळाले असते तर मराठ्यांनी हिंदुस्थानचे राष्ट्रीय एकी- करण केले नसते, असे तरी कोणी सांगावें ? सारांश " प्राचीनकाळी हिंदुस्था- नांत आलेले सर्व प्रवासी, हिंदुस्थानांतील उच्च दरजास पोहोचलेली संस्कृति पाहून चकित होऊन गेलेले आहेत. गजबजलेली शहरें, अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केलेली शेती, कलाकौशल्याच्या तयार केलेल्या निरनिराळ्या वस्तू, प्रचंड व्यापार शोभित शिकेलेया निदर्शक आहेत. " ( Colonies and