Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६८ )

व्यवस्था, वगैरे अनेक बाबतीं संबंधानेंही, उदाहरणासह, पुष्कळच लिहिता येण्या सारखे आहे, व त्यासंबंधों तुलनात्मक दृष्ट्या मोठ्या विशद रीतीनें विवेचनही करितां येण्यासारखे आहे. परंतु स्थलाभावामुळे साधारण कल्पना करिता येईल इतकीच त्रोटक माहिती या ठिकार्णी दिलेली आहे; तथापि, हिंदुस्थानांतील सर्वच हिंदु मुसलमान राज्यकर्ते सद्गुण संपन्न व कर्तृत्ववान होऊन गेले, असे मात्र वरील विवेचनावरून समजावयाचें नाहीं. जगांतील कोणत्याही देशांतील इतिहासात सद्गुणसंपन्न व कर्तृत्ववान राज्यकर्त्यांची संख्या हातांबोटांवर मोजण्या इतकच असणार व असते हैं उघड आहे; त्याप्रमाणेच जगांतील कोणत्याही अत्यंत सुधारलेल्या म्हणून लौकिक असलेल्या राज्यकारभारांतही कांहींना काहीं तरी व्यंग, कमीपणा, अथवा नवीन जरूरीमुळे उत्पन्न होणाऱ्या गोष्टीबद्दल तजवीज करण्याची आवश्यकता, हीं भासणारच हादी सिद्धांत आहे; आणि असे दोष अफगाणिस्थानाच्या बिन सुधारलेल्या अमीराच्या राज्यांत जसे दाखविता येतील, तसेच सुधारणेच्या उच्च शिखरावर असलेल्या इंग्रजांच्या ग्रेट ब्रिटन व हिंदुस्थान या देशांतील राज्य व्यवस्थेत ही दाखवितां येतील; म्हणून आशियांतील राज्ये आतो जपान लायक असल्याचे ठरले आहे म्हणून तेवढे एक राष्ट्र सोडून तेवढीं सर्व नालायक, व अपात्र, आणि युरोपियन राज्य तेवढींच काय तीं लायक व पात्र असे म्हणणे निव्वळ स्वार्थमूलक व खोडसाळपणाचें आहे; इतकेंच नव्हे तर तो एक अधूनिक हेत्वा भास ( Modern fallaoy ) ही आहे; आणि जगांतील शहाणपण, ज्ञान, व कर्तृत्व शक्ति, वगैरे बाबतीचा, परमेश्वरानें कोणत्याही एखाद्या एकट्याच मनुष्यास, जातीस, समाजास, देशास अथवा खंडास, विशिष्ट हक्क, मक्ता, अथवा कुलपर बाना ( Moaopoly ) दिलेला नसून त्याची सर्व जगभर त्यानें विभागणी केली आहे, ही गोष्ट जगाच्या इतिहासांतील निरनिराळ्या देशांच्या उदाहरणावरून सिद्ध करून देता येण्यासारखी आहे. युरोपियन लोक जगभर व्यापारा करितां • भटकत फिरले; तराजू मागून तरवार, व्यापारा मागून बंदूक, व बायबला मागून संगीन, या क्रमाने त्यांनी जगांत निरनिराळ्या ठिकाणीं वसाहतों केल्या; कित्येक प्रदेशांत श्रेष्ठ सत्ता, अथवा सार्वभौमत्वाचे अधिकार प्रत्यक्ष आपणाकडे न घेता वर्चस्वाचे क्षेत्र म्हणून त्यांनी आपली अप्रत्यक्ष हुकमत, प्रस्थापित केली; ब. कित्येक प्रदेशाचे ते स्वतः प्रतिनिधी, राज्यकर्ते व सामंत - चक्राधिपति,