Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६७ )

वजनांत लबाडी केल्यास लबाडीनें उपयोगांत आणिलेल्या वजनाच्या भारोभार त्यांच्या अंगाचे मांस काढून घेण्यात येत होतें; शिवाय धान्या प्रमाणेच भाज्या, फळें, साखर, कंगवे, सुया, तेल, टोप्या, जोडे, घोडे, गुलाम, नौकर, मोलकरिणी, व वेश्या, इत्यादिकांची ही त्यानें किंमत ठरवून दिली होती; व त्यांत गुलामास १० ते १५ रुपये, मुरूप नौकरास २० पासून तीस रुपये, मोलकरिणीस ५ पासून १२ रुपये, ब वेश्येस २० पासून ४० रुपये, असे भाव ठरविले होते; त्या प्रमा- र्णेच बहामनी रियासतींतील दुसरा महमंदशहा याचा प्रसिद्ध वजीर महमंद गवान यानें जमीनीची मापणी करून सरकार देण्याचे कायमचे दर, व राज्याच्या लष्करी व्यवस्थेची ही पुनर्घटणा करून सैन्यास ठरीव व वेळेवर पगार देण्याचें नियम ठरविले होते. या बाबतींत आणखी असाही उल्लेख आढळतो कों, इ० सन १४७० मध्ये बहामनी लष्करास मिळत असलेला पगार इ० सन १८३० मध्ये म्हणजे १४७० नंतर ३६० वर्षांनी इंग्रजी लष्करास मिळत असलेल्या पगारापेक्षा पुष्कळच जास्त होता; शिवाय या उभयतां कालांमधील ३६० वर्षाच्या कालांतील परिस्थितींत पडलेला महत्वाचा फरकही लक्षांत घेणे आव- श्यक आहे; कारण पैशाची किंमत त्या काळांत हल्लींच्या मानानें पुष्कळच जास्त होती; म्हणजे अर्थातच आवश्यक अशा संसारोपयोगी जिनसांची किंमत पुष्कळच कमी होती; अशा स्थितींतही ५०० घोडे स्वा र रांच्या पथकाचा बहामनी राज्यांतील इ. सन १४७० मधील वार्षिक खर्च ३,१५,००० रुपये होता; आणि एव ढ्याच इंग्रजी घोडेस्वारांच्या पथकाचा इ. सन १८३० मधील वार्षिक खर्च, २,१९,००० होता; त्याप्रमाणेच इ. सन १४७० मध्यें, स्वतःचा घोडा, व हत्यारें, बाळगणाऱ्या शिलेदारास बहामनी राज्यांत ४० रुपये पगार मिळत होता; व इ. सन १८३० मध्यें, अशा शिलेदारास इंग्रजी सैन्यांत वीस रुपये पगार मिळत होता; एकंदरीत पाहता बहामनी राज्यातील सर्व खात्याचे काम चांगल्या प्रकारानें चालले होतें असें दिसते; आणि राज्यव्यवस्थेतील निर- निराळ्या खात्यांचा परस्परांवर इतका व्यवस्थित दाब होता कीं, अन्याय कर- ण्यास फारशी जागा नव्हती, असें म्हणणें प्राप्त होतें. (Meadows Taylors Students History of India हे पुस्तक पहा.)
 वरील हकीकती प्रमाणेच, प्रसिद्ध मोंगल बांदशहा अकबर बाची, आणि इतर हिंदू मुसलमान राज्यकर्त्यांची राज्यव्यवस्था, वसुली व्यवस्था, सैन्य-