Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६६)


मिळालेल्या सनदां अन्वयें नेमिल्या गेलेल्या कित्येक मोठमोठ्या सुभेदारांच्या अमलाखाली फ्रान्सच्या राज्या इतकी अथवा जर्मनीच्या प्रजे इतकी प्रजा असे; आणि या राज्यकर्त्या इतके त्यांच्याही अमलाखालील प्रदेशाचे उत्पन्न असे. त्या प्रमाणेच या सुभेदारांच्या हातांखाली दुय्यम अथवा नायव सुभेदार या नांवाचे अधिकारी असून त्यांच्या तात्र्यांतही टस्कनीचा ड्यूक व साक्स- नीचा इलेक्टर यांच्या इतका प्रदेश असे, व त्या प्रदेशाचे उत्पन्न ही त्यांच्या ताब्यातील प्रदेशा इतकेच असे; " या एवढयाच त्रोटक वर्णना- बरून ही मोंगली राज्याच्या वैभव संपन्न स्थितीची बरीच कल्पना करितां येते; तथापि या काळाच्या तीन शतके अगोदरच्या काळाची ही उपलब्ध माहिती या ठिकाण देतां येण्यासारखी आहे ती ही कीं, खिलजी घराण्यांतील सुलतान अल्लाउद्दीन ( कारकीर्द इ० सन १२९५ ते इ० सन १३१६ ) यानें इ० सन १३०३ नंतर, आपली फौज नेहमी जय्यत स्थितीत असावी म्हणून, एक नवीन योजना घडविली; त्यांत स्वारांचा सालीना तनखा २३४ टंक म्हणजे ३६० रुपये ठरविला, व स्वाराने एक अधिक घोडा ठेविल्यास त्यास दरसाल शंभर रुपये अधीक देत जावे, असा नियम केला; त्याप्रमाणेच शिपाई, स्वार वगैरे सैन्यातील लोकांना, त्यांना मिळणाऱ्या पगारात त्यांची चांगली गुजराण होऊन त्यांनां आपापली हत्यारें ही सुस्थितीत ठेविता यावी, म्हणून त्यानें धान्याच्या विक्री संबंधीं दर ठरविले; ते असे की, गहूं, दर अठ्ठावीस शेराच्या मजास तीन आणे, तांदूळ, व डाळ, दर मणास दोन आणे, व मसूर एक आणा; वास्तवीक पाहता त्या वेळचा बाजारचा दर ही हाच होता; परंतु पुढे महर्गवा होऊन कदा- चित धान्याचे भाव वाढल्यास अगाऊ खबरदारी व तरतूद म्हणून त्यानें हो योजना केली होती; शिवाय दिल्ली शहरांत केव्हां ही धान्याचा तुटवडा येऊ नये म्हणून त्याच्या ताब्यांतील दुआब चगैरे प्रांतांतील वसूल रोख रकमेत न घेतां धान्य रूपाने घ्यावा, आणि धान्याचो महर्गता झाली तरी सुद्धां ठरीव भावानेंच लोकांना व्यापा-यांनी धान्याचा पुरवठा करीत जावा अशी त्यानें तजवीज केली होती; त्या प्रमाणेच धान्याची ने आण करण्यास स्वतंत्र माणसांची योजना केली होती; कोणीही ठरीव भावाहून जास्त किंमत घेतल्यास त्यास त्या बद्दल शिक्षा देण्यात येत होती, आणि कोणी