Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६५ )


बाप दयाराम द्दा अमीनखाना जवळ असून तो त्याच्या अतीशय भरंवशाचा व प्रेमातील सरदार होता; त्यास अमीनखानानें हुसेनच्या छावणींत पाठवून रतनचंदास पकड विटे; त्याचे हाल करून त्यास आपणासमोर आणवून नंतर त्यास प्रतिबंधात ठेविले; आणि पुढे अवदुला व बादशहा यांच्या मध्ये युद्ध सुरू झाल्यावर महंमदशहानें रतनचंदास आपणासमोर आणवून त्याचा वध कर विला; ( ता० १३-११ १७२०. ) त्या नंतर दुसन्याच दिवशीं ता० १४ रोजीं दिल्ली व मथुरा या मार्गावर यमुना तोरी हसनपूर येथें अब्दुल्ला व बादशहा यांच्या मध्ये युद्ध होऊन अब्दुल्ला पाडावा झाला, व पुढे दोन वर्षांनी ( ता० ११ ऑक्टोबर १७२२) त्याचा ही खून होऊन सय्यद बंधूंचा क्रांतिकारक इतिहास समाप्त झाला. वरील विवेचनावरून, नुसलमानी अमदानीत हिंदू लोकांचे कित महत्व होतें, याबद्दल कोणासही सहज योग्य कल्पना करितां येईल, असे म्हणण्यास हरकत नाहीं.
 हिंदुस्थानांतील निरनिराळ्या मुसलमानी अमला खालील हिंदू प्रजेची सुस्थिती, त्यांची सैन्य व राज्य व्यवस्था, त्यांची हिंदू लोकां बरोबरील वागण्याची पद्धति, त्यांचा राज्यकारभार, प्रजेच्या सुख समृद्धि करितां त्यांनीं केलेली अनेक कृत्ये, वगैरे बाबत संबंधानें पुष्कळच निरनिराळी व उपयुक्त माहिती देता येण्यासारखी आहे. तथापि स्थलाभावामुळे पुढील भागांत त्या संबंधीं विवेचन केलेले असल्यामुळे ह्या ठिकाणी त्या संबंध अगदी थोडक्यांतच उल्लेख करणे इष्ट आहे. मेकॉले यानें “लार्ड लाईव्ह " या निबंधांत मोंगल सान्नाच्या विषयीं मोठें सरस व चटकदार वर्णन केलेले असून त्याच्याच शब्दांत म्हणावयाचें म्हणजे, “सोळाव्या शतकांत चार व त्याचे मोंगल अनुयायी, यांनी जे साम्राज्य स्थापन केलें, तें त्या वेळों जगांत अत्यंत मोठें, व्यापक, व वैभव संपन्न होतें. कोणत्याही युरोपियन राज्यांत एकाच राज्यकर्त्यांच्या अमला- खाली एवढ्या मोठ्या लोक वस्तीचा प्रदेश नव्हता; व त्याच्या खजिन्यातही मोंगल साम्राज्या इतकी संपत्ति जमा होत नव्हती, ज्यांनीं सेंट पिटर पाहिले आहे, ते प्रवासी लोक सुद्धां हिंदुस्थानांतील या मुसलमान साम्राज्याधिपतींनीं बांधिलेल्या इमारतींचे सौंदर्य व वैभव पाहून थक्क होऊन गेले; दिल्लीच्या तख्ता सभवतील असंख्य परिवार व अनुपमेय शोभा पाहून, ज्यांनी व्हरसे लीस चें वैभव नेहमी पाहिले होतें, त्यांचेही नेत्र दिपून गेले. मोंगल बादशहाकडून,