Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६४ )


अबदुला हा आपला कारभार, इतर सर्व राजकीय व्यवहार, व कारस्थान, करीत होता. आणि रतनचंदाचे त्याच्यावर इतकें वजन होतें कीं त्याच्याच शिफारशीनें अबदुल्ला यानें हिंदू लोकांवरील जिझिया कर बंद केला होता; पुढे सय्यद बंधू व फर्रुखसेयर यांच्यामध्ये अपसांत वैमनस्य आल्यावर हिंदुद्वेष्टा, व अवरंगझेबाच्या कारकीर्दीत प्रसिद्धीस आलेला अनुभवी सरदार, इनायतउल्ला, याची बादशहानें रतनचंदच्या जागी नेमणूक केली व रतनचंदास नौकरींतून काढून टाकण्याचा हुकूम केला; परंतु अबदुला सन्यदानें तो मानिला नाहीं, व उभयत सव्यद बंधू व बादशहा यांच्या मधील वैमनस्याची परमावधी होऊन संय्यद बंधूंनों बादशहास पकडण्याचे कारस्थान उभारिले. त्यांतही रतनचंद यानेंच प्रमुखत्वानें भाग घेतला होता; व तो अबदुला याचा कंठमणी असल्यानें त्याच्याकडेसच बादशहास पकडण्याची कामगिरी सोपविण्यात आली होती; त्याप्रमाणे रतनचंद हा जनानखान्यांत फौज घेऊन गेला; ता० २८ फेब्रुवारी इं. सन १७१९ रोजी फर्रुख्सेयर बादशहास कैद करून पुढे त्यास ठार मार- ण्यांत आले, व सय्यदांनीं महंमदशहाची तख्तावर स्थापना केली; तेव्हां रतन- चंद, बादशहा खिसियर याचा सासरा मारवाडकर अजितसिंग, कोठ्याचा राजा भीमसिंग, यांच्या शिफारशीवरून सय्यदांनी पुन्हा लागलीच हिंदू लोकां वरील जझिया कर माफ केला; पुढे उभयतां सय्यद बंधूंमध्ये वांकडे आले, तेव्हां ही रतनचंद यानेंच उभयतांची समजूत घालून त्यांचा समेट घडवून आणिला; ' वं राजा गिरिधर बहादूर सारखा प्रबळ व शूर सरदार सय्यदांच्या पक्षांत ओढून घेण्याची महत्वाची कामगिरीही त्यानें यशश्वीपणे बजाविली. पुढे लवकरच महंमदशहाचा मुक्काम जयपूर जवळ असतां हुसेन सय्यदाचा खून झाला; त्याची छावणी लुटण्यांत आली; त्याचे सर्व सरदार आपला जीव घेऊन पळून गेले; आणि सर्व छावणीभर भावी वजीर महंमद अमीनखान याने मोठ्या जोराची दंगल उडवून दिली. या वेळी रतनचंद हुसेन बरोबर होता. त्यास ही इतरां प्रमाणेच पळून जाण्यास सवड होती, संधी होती, व पुष्कळांनी त्यास पळून जाण्यास ही सांगितले होते; परंतु त्याने कोणाचे ही म्हणणं मान्य केले नाहीं; हुसेनची छावणी सोडिली नाहीं; आणि स्वतःच्या जिवाची हो क्षिती बाळगली नाहीं; हुसेनचा खून झाल्या नंतर रतनचंदाने ही बातमी ताबडतोत्र अब्दुल्ला यांस कळविली; व तो तेथेंच छावणीत राहिला; राजा गिरिधर बहादूर याचा