Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६३ )


हिंदू लोकांच हे महत्व कायम होतें; ही गोष्ट अनेक उदाहरणे देऊन सिद्धू करितां येण्यासारखी असून नमुन्या दाखल तशीं दोन उदाहरणे या ठिकाणीं ग्रंथित केली आहेत; जहांदरशहा हा मोंगली गादीवर आल्यावर प्रसिद्ध मुसलमान सरदार झुल्फिकारखान हा मुख्य वजीर झाला. त्याच्या जवळ सभाचंद या नांवाचा एक खत्री जातीचा मनुष्य असून त्याच्यावर खानाचा अत्यंत विश्वास होता; झुल्फिकारखान वजीर झाल्यावर त्यानें सभाचंदास राजा हा किताब देऊन, त्यास "दिवाण-ई-खालसा " - म्हणजे वसूली व हिशोबी खात्यावरील मुख्य अधिकारी नेमिलें होतें; व त्याच्याच मसलतीने व विचाराने खान राज्यकारभार चालवीत होता. परंतु त्यामुळे दरबारात खान व सभाचंद या उभयतां बद्दल द्वेषभाव उतन्न झाला. पुढे जहांदरशहा व फर्रुख सेयर या उभयतांमध्ये आग्रा येथें युद्ध होऊन त्यांत फर्रुखसेयर आणि त्याचा पक्ष प्रबळ करून त्यास बादशाही पद मिळवून देणारे हसन अली व हुसेन अली हे उभयतां सय्यद बंधू - विजयी झाल्यावर हसन अली उर्फ अबदुल्ला खान कुत्बू-उल्-मुल्क् यानें सभाचंदास केंदत टाकून त्याची सर्व माल मिळकत लुटून घेतली. आणि पुढे झुल्फिकारखान व त्याचा बाप आसदखान यांचा वध झाल्या नंतर, ता. ४ जुलै इ० सन १७१३ रोजीं, सभाचंदानें या दुष्ट कृत्याचा मोठ्या जोरानें निषेध केल्यामुळे, प्रथम त्याची जीभ कापून, नंतर त्याचा शिरच्छेद करण्यात आला; दुसरें उदाहरण म्हणजे सय्यद बंधुचेंच होय. अबदुला यानें समाचंदाचा वध केला, पण तो राजकीय कारणामुळे, आणि आपल्या धन्याच्या बधाबद्दल त्यानें तीव्र निषेध व्यक्त केला, त्यामुळेच होय; सभाचंद हिंदू, म्हणून नव्हे; कारण या सय्यद बंधूंच्या कारकीर्दीत तर राज्यकारभारांत हिंदूंचेच विशेष महत्व बाढलेलें होतें; आणि मोंगल बादशाहीत मराठे व रजपूत यांचे प्राचल्यही याच सय्यद बंधूच्या कारकीर्दीत विशेष वृद्धिंगत झाले होतें. रतनचंद हा “बनिया " म्हणजे वाणी होता-या नावाचा एक मोठा हुषार, व वसुलाच्या आणि हिशोचाच्या कामांत पूर्ण निष्णात असा मनुष्य अबदुल्ला सय्यदाच्या जवळ असून तो त्याचा निव्वळ उजवा हात होता. हा रतनचंद मोठा इमानी, विश्वासू, खटपटी, व आपल्या धन्याच्या उत्कर्षा करिता अतीशय झटणारा होता; अबदुल्ला यानें फर्रुखसेयर बादशहास सांगून त्यास काही काळपर्यंत " दिवाण- ई-खालसा " नेमविले होतें; रतनचंदाच्याच मतानें व मसलतीनें,