Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६२ )


एका मनुष्यास इजितमध्यें खलीफा बनवून इजितच्या सुलतानासाठी त्याचा आशिर्वाद मिळविला. नंतर इ. सन १५२० पर्यंत खलीफा व खिलाफत हीं इजिप्तमध्ये कायम होती, परंतु त्या वर्षी तुर्कस्थानचा आटोमन वंशांतील सुल.. तान सेलीम यानें इजितचा सुलतान कुनशुलधरी याच्यावर स्वारी करून त्याचा पराभव केला; तेव्हां खलीफा, सेलीमच्या पचास मिळाला. व त्याच्या बरोबर कान्स्टॉटिनोपल येथे गेला. नंतर खलीफा अलमुसा यानें आपले सर्व अधिकार तुर्की मुलतान उस्मान अल्ली याच्या स्वाधीन केले, व आपण इजिप्तमध्यें परतः निघून गेला. म्हणजे आटोमन राजघराण्यांतील खलीफांचे अधिकार दुरंगी- म्हणजे राजकीय व धार्मिक गुरुत्वाचे असे दुहेरी आहेत. शिवाय जरी काहीं काळ काहीं खलीफा इजिप्तमध्यें राहिले असले तरीही महंमदी पवित्र भूमीवर त्यांचाच हक असून इजिप्तचे मुलतान खलीफांच्या तर्फे त्यांचे रक्षण करीत असत; पुढे या पवित्र भूमी वरील इजिप्तचा ताबा नाहींसा होऊन, खलीफा पदा- बरोबरच तोही आटोमन सुलतानाकडे गेला, व त्या वेळेपासून आज तागायत ते त्यांचें सरक्षण करीत आले आहेत. " उलटपक्षों मराठ्यांच्या इतिहासात राज-- कीय व धार्मिक अधिकार निरनिराळ्याच व्यक्तिच्या हातांत राहिलेले आहेत; आणि हेच वैशिष्य अतीशय महत्वाचें व लक्षांत ठेवण्या सारखे आहे.
 हिंदुस्थानांत मोंगल साम्राज्य अस्तित्वात होतें, त्या काळापूर्वी, व त्या काळांतही, अनेक मुसलमानी राज्ये विद्यमान होतीं; आणि विजयानगरकर रामरायाचा तालीकोट जवळील युद्धांत नाश होऊन तें राज्य नामशेष झाल्या वेळेपासून मराठ्यांचे राज्य निर्माण होईपर्यंत दक्षिणेंत पहिल्याने बहामनी राज्य, व नंतर त्याच्या शाखा, व उत्तरेस मोगल साम्राज्य, सत्तापूर्ण होतें. या सर्व राज्यांत मोठमोठ्या अधिकाराच्या जागा मुसलमानांनाच मिळत असत; तरी सुद्धां अशा बहुतेक सर्व अधिकाऱ्याजवळ हुषार हिंदू गृहस्थ कामास नेमिलेले असत; दिवाणी, चिटणीशी, हिशोबी, वकीली वगैरे कामावर हिंदुच्या नेमणुका होत असत, व ते विशेष विश्वासांतील असून त्यांचा त्या अधिका-यांना अतीशय उपयोग होत असे. मुसलमानी अमदानींत अशीं अनेक हिंदू कुटुंबें, दक्षिणेंत व उत्तरेकडे मुसलमान सरदारांजवळ पिठ्या-- नुपिढ्या कार्मे करून प्रसिद्धीस पावलेली होती. अवरंग सेवाच्या मृत्यू नंतरही