Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६१ )


सत्ता या दोन्हीं एकाच व्यक्तिच्या हाती असून त्या मुळेच उद्दिष्ट कार्याकरितां त्यांना एकवटलेल्या दुरंगी सत्तेचा मोठा जोरदार आश्रय मिळालेला आहे; व म्हणूनच शंकराचार्य व खलीफा यांच्या सत्तेमध्ये अत्यंत महत्वाचा फरक दृष्टोपत्तीस येत आहे. मुसलमानी खिलाफत म्हणजे एकवटलेली दुरंगी सत्ता होय; या संबंधीं थोडक्यात म्हणावयाचें म्हणजे, (मॉडर्न रिन्यू मधील श्री जोतींद्रनाथ चतर्जीचा लेख पहा.) "महंमद पैगंबराच्या उदया पूर्वी अरेबिया प्रांतात एकी नव्हती; तेथे • निरनिराळी लहान राज्य होतीं; व लोक मूर्ति पूजक व रानटी होते. या लोकांनां महंमदानें इस्लामचा एकेश्वरी धर्म शिकविला; व देशांत एकी घडवून आणिली. • महंमदाचे अनुयायी त्यास राजकीय (ऐहिक ) व धार्मिक गोष्टींत आपला सर्व श्रेष्ठ गुरु मानूं लागले. या दुरंगी सत्तेचेंच दुसरें नांव "खिलाफत " हे असून या दोन्हीं ही सत्ता ज्या व्यक्तिच्या हाती एकवटलेल्या असतीस त्यास "खलीफा” अर्से म्हणत असत. आरंभ आरंभी खलीफा लोक नियुक्त असत; पण पुढे पुढें ही सत्ता निरनिराळ्या वंशाकडे गेली, व ती नंतर वंशपरंपरागत होऊन बसली.
 स्वतः महंमद पैगंबराने आपल्या जावयाला खलिफा नेमिलें नाहीं. कारण खलीफा हा लोकनियुक्त असावा, असे त्याचे मत होतें. महंमद पैगंबरा नंतर अत्रूचकर, उमर, उस्मान, व अल्ली, असे चार खलीफा अनुक्रमें गांदीवर आले; हे चारीही, लोकनियुक्त खलीफा होते. आटोमन कुळातील मुआविया यानें अली पासून खिलाफत मिळवून आपल्या मुलाला खलीफा पदावर स्थानापन्न केलें, व लोक नियुक्त पद्धति बंद केली. है पद या घराण्यांत जवळ जवळ एक शतक पर्यंत टिकलें; (इ० सन ६६१-७५० ) व पुढे तें आव्बासी वंशाकडे सुमारें पांचशे वर्षे टिकले. या काळांत अनेक महत्वाच्या राजकीय उलाढाली झाल्या; मुसलमानांनी आफ्रिका, इजित, हिंदुस्थान, वगैरे ठिकाण आपली मोठमोठीं . राज्य स्थापन केलीं; त्याबरोबर खलीफांची राजकीय सत्ता नष्ट झाली, व त्यांच्या- कडेस एकटें धर्म-गुरुत्व शिल्लक राहिले. इ० सन १२५७ या वर्षी हुलूगु या मोंगल राजानें बगदाद शहरावर हल्ला करून अच्चासी वंशांतील शेवटचा खलीफा अल्ली मुस्तासीम यांस ठार मारिलें, व तेथील खिलाफतीचा शेवट केला; परंतु इजिप्स मध्यें राज्य करीत असलेल्या बेबार राजाला खलीफा पद प्राप्त न झाल्यामुळे त्यानें अच्चासी वंशांतीन अल्ली मस्तानशीर या नांवाच्या