Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६० )


व मलिकंबर, अदिलशाहींतील इब्राहीमशहाचा वजीर आसदखान, कुली कुशहा, काश्मीरचा शहामीर, ( शमसुद्दीन, शादीखान उर्फ झेन-उल्- अबीद्दिन ) माळवा प्रांताचा सुलतान हुशंगशहा, व त्याचा मुलगा गज्नीखान, खानदेशचा सुलतान मलीक राजी फरूकि, मीरन मुबारिकखान, जोनपूरच्या शर्की घमण्यां- तील मुबारिकशहा, बंगालचा अलिवर्दीखान, औध मधील सुजाउद्दवला, वगैरे अनेक नामांकित मंडळी– निर्माण झालेली आहेत; आणि हिंदू लोकां प्रमाणेच. त्यांच्यांतही कांहीं राजकारणी व शूर स्त्रिया निर्माण झालेल्या आहेत; इ. सन १२५० मध्ये, शजारुद्दर या नावाची एक भोठी शूर व पराक्रमी राणी इजित- देशावर राज्य करीत असून तिने धर्मयुद्धांतील एकांत फ्रान्सच्या नवव्या लुईचा पराभव केलेला आहे; सुलताना रझिया व चांदविवी या तर हिंदुस्थानांतील अतीशय प्रसिद्ध अशा राजकारणी स्त्रिया म्हणून नावाजल्याच गेलेल्या आहेत, आणि थोडक्यांत म्हणावयाचे म्हणजे मुसलमान लोकही कर्तृत्ववान असल्याचे इतिहासावरून स्पष्टपणे दृग्गोचर होत आहे.
 तथापि मराठे व मुसलमान यांच्या राजकीय उत्कर्षांमध्ये एक अतीशय महत्वाचें व लक्षांत ठेवण्यासारखे वैशिष्य आहे. तें असें कीं मराठ्यांची सत्ता एक रंगी होती; उलटपक्ष मुसलमानांची सत्ता दुरंगी होती. प्रसिद्ध माधवाचार्य उर्फ विद्यारण्य स्वामी हा मोठा मुत्सद्द व राजकारणी साधु पुरुष होता, व राज्य व धर्म या दोहोंचा मिलाफ करून आणि हरीहर यांस प्रोत्साहन व सांपत्तिक मदत देऊन त्याच्या कडून विजयानगरच्या भावी बलाढ्य राज्याची उभारणी करविली; म्हणजे धर्म गुरुला राजसत्तेचा आश्रय मिळविण्याकरिता दुसन्याची मदत घ्यावी लागली. अर्थात लायक व कर्तृत्ववान राज्यकर्ता असेल, व मुत्सद्दि व राजकारणी धर्मगुरु त्याला लाभेल-म्हणजे राज- सत्ता, व धर्म - सत्ता या दोन दोघांच्या हाती असलेल्या सत्ता एक मताने उद्दिष्ट कार्याकरितां पुढे येऊन परस्परावलंबी होतील, तरच राज्य व धर्म या दोहोंचा मिलाफ करित+ येईल; तसा मिलाफ झाला म्हणूनच विजयानगरच्या भावी बलाढ्य राज्याची उभारणी झाली, व विजयानगरकरा प्रमाणेच रामदास स्वामी-जरी स्वामीनें राजकारणात प्रत्यक्ष भाग घेतला नाहीं तरी-व छत्रपति शिवाजी यांची ही गोष्ट आहे. परंतु मुसलमानी सत्तेच्या उगोष्ट नसून सज-सत्ता, व धर्म-