Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८ )

ण्याचे हें एक विशिष्ट साधन ठरलेलें होतें. या आर्यलोकाना कारागिरी अवगत असून त्यांच्यांत सुतार, लोहार, तांबट, विणकरी, वगैरे कामे करणारे लोक असत; आर्यलोक हे गहूं, सातू, व इतर निरनिराळीं धान्यें पिकवीत; व हीं धान्यें आणि दूध, तूप, यावर ते आपला उदरनिर्वाह चालवीत; शिवाय ते मांसाहारही करीत असून 'सोम' या नांवाचे मादक पेयही सेवन करीत असत. अशा रीतीनें इ. सनापूर्वी १००० च्या सुमारास आर्य लोक हे पंजाबांत स्थाईक होऊन राहिले होते.
 तथापि, आर्यलोक हिंदुस्थानांत शिरण्यापूर्वीच द्राविडी लोकांची सुधारणा बरीच उच्च दर्जास पोहोचलेली होती, ही गोष्ट अजूनही त्यांच्यांतील कित्येक सामाजिक रीतिरिवाजांवरून निदर्शनास येते: या लोकांची मुख्य वस्ती हिंदुस्था- नच्या मध्य व दक्षिण नागांत आहे, व पूर्वकाळी उत्तर भागांतही त्यांची वस्ती होती. आर्यलोक पंजाबात स्थाईक झाल्यानंतर हिंदुकुश पर्वताच्या उत्तरेस जे आर्यलोक रहात असत, त्यापैकी एक शाखा दक्षिण दिशेने प्रयाण करीत चित्रळ व स्वात, या मार्गानें पंजाबात आली; तेव्हां त्या प्रातांत वसाहत करून राहिलेल्या जुन्या आर्याची व या नवीन आलेल्या शाळेची मोठया जोराची भांडणें उपस्थित होऊन युद्धकलह सुरू झाले; त्यामुळे जुन्या आर्यांची पांगा- पांग होऊन ते पंजाबांतून पूर्व बाजूनें मार्ग क्रमीत गंगा व यमुना या नद्यांच्या काठी असलेल्या प्रदेशांत येऊन दाखल झाले; तेथे त्यानीं प्रथम आपल्या वसाहती स्थापन केल्या व त्यानंतर ते हळुहळू विध्याद्रिपर्वत ओलांडून नर्मदा नदीच्या कांटच्या प्रदेशापर्यंत येऊन पोहोंचले; तथापि उपरिनिर्दिष्ट जुन्या व नव्या आयांमध्ये जे मोठ्या जोराचे झगडे माजले त्यामुळे जुने आर्य, नवे आर्य व त्यांनी ज्या मूळच्या रहिवाशांस आपणांमध्ये जोदन घेतलें होतें, ते लोक, या सर्वाच एकीकरण होऊन ( इ. सनापूर्वी ५०० च्या सुमारास ) त्यामुळे एक निराळीच जात निर्माण झाली; या जुन्या व नव्या आयांमध्ये भरत या नांवाचे एक मोठे शूर व प्रमुख घराणे होते; याच कुलांत प्रसिद्ध कौरव व पांडव यांचा जन्म झालेला असून या उभयतांमध्ये अठरा दिवस भयं- कर युद्ध आले; त्याचे वर्णन भारत अथवा महाभारत या ग्रंथांत असून हैं युद्ध इ. सनापूर्वी १२०० च्या सुमारास झाले; व आर्याच्या ह्या मोठ्या उदात्त व वीररसप्रधान काव्याची रचना ३. सनापूर्वी ५०० व इ. सन ५०० या कालांत