Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२५९)


प्रसंगा प्रमाण त्यांची स्तुती अथवा निषेध व्यक्त करणे हीच गोष्ट न्यायाची -ठरेल, हे उघड आहे.
 जगातील इस्लामी धर्मा संबंधाने म्हणावयाचे म्हणजे एक काळ असा होता की, मुसलमान लोकांचे राजकीय वर्चस्व सर्व जगभर पसरते की काय, अशी भीती उत्पन्न झाली होती, आणि युरोप खंडातील युरोपियन राज्यें मुसलमान- मय होणार की काय, अशा बद्दल युरोपियन लोकांनी अत्यंत काळजी वाहूं लागली होती. एके काळीं चास्फरसच्या सामुद्रधुनी पासून उत्तर आफ्रिकेच्या किना-याने थेट जिब्रालटर पर्यंतचा प्रदेश त्यांच्या तात्र्यांत होता; आणि त्यांनी, सर्व युरोप खंडावर स्वत:च्या कर्तृत्वानें आपला दरारा बसविला होता; परंतु इ० सन७३२ मधील टूर्सच्या ( हे ठिकाण फ्रान्स मध्ये पॉयंटियर्स या गांवा जवळ आहे. ) युद्धानें मुसलमानी विजयाचा यशश्री तारा अस्तास गेला, व युरोप खंड या अरिष्टांतून निभावले; प्रसिद्ध फ्रेंच सेनापती मॉनशियर चार्लस मार्केट यानें • मुसलमानी सैन्या बरोबर मोठ्या निकराचे युद्ध करून त्यांत निर्णयात्मक विजय मिळविला, आणि स्पेन देश जिंकणारा प्रसिद्ध नुसलमान सेनानी अब्दु रहिमान हा आपल्या सर्व सैन्यासह मारला जाऊन त्यामुळे मुसलमानांच्या तिकडील क्षेत्रांतील भावी दिग्विजयास कायमचा आळा बसला; व त्या काळा- पासून मुसलमान लोक जे मार्गे परतले ते पिरनीजच्या पलीकडे आजपर्यंत केव्हाही गेले नाहींत ; युरोपखंडाप्रमाणेच आशिया खंडांतही त्यांनी दिग्विजय मिळवून अनेक राज्ये स्थापन केली; हिंदुस्थानावर अनेक स्वान्या केल्या, व या देशांत राज्य स्थापन करून ते स्थाईकही बनले; मुसलमान लोकांनी इकडे राज्य स्थापन केल्यानंतर त्यांच्यांतही अनेक नामांकित मंडळी मुलतान रेझिया उर्फ रझिया, ग्यास उद्दीन तुलख कित्येक ठळक दुर्गुण दृटी आड केल्यास उत्तर लेखक, वक्ता, गणितज्ञ, वैद्यक, तर्क, व न्यायशास्त्राचा ज्ञानी, कवी, व जमाबंदीची नवी व्यवस्था सुरू करणारा पहिला राज्यकर्ता महंमद तुघ्लख, प्रसिद्ध प्रजाजन हितेच्छु फिरोज तुप्ख, व त्याचा मुत्सद्दि वजीर मक्बुलखान, सय्यद स्विजरखान, व मुवारिक, शिकंदरलोदी, बाबर, शेरशहा सूर, हुमायून, जगांतील महान् राज्यकर्त्यांमध्ये गणला गेलेला अकबर व त्याचा स्नेही, सल्लागार व मुत्सद्द अबुल फज्ल, जहांगीर, शहाजहान, दुसरा महंमदशहा बहा- मनी वाचा प्रसिद्ध वजीर महंमद गवान, निझामशाहीतील प्रसिद्ध चांदीवी