Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२५८ )


त्याप्रमाणेच पुढील काळात प्रसिद्ध पानिपत येथील अस्मानी सुलतानींत इब्राहीम- खान गारदी हा मराठ्यांच्या तोफखान्याचा मुख्य अधिकारी होता; ऐन आणी- बाणीच्या प्रसंग मराठ्यांच्या गोटांत फितूरी करून, इब्राहीमखानास त्यांच्या पक्षांतून फोडण्याचा मोटया जारीनें प्रयत्न झाला; लालूच व धमकी हे दोन्हींही प्रयोग आळीपाळीनें त्याच्यावर करण्यांत आले; परंतु त्यांनां तो वश झाला नाहीं; आणि कोणत्याही मोहास बळी न पडतां, अखेरपर्यंत एकनिष्टेर्ने वागून, शेवटीं शत्रूच्या हातीं जिवंत सांपडून, त्याचा अत्यंत क्रूरपणानें वध होतानाहीं त्याने आपल्या इमानी वागणुकींत अंतर पडूं दिलें नाहीं, ही गोष्ट लक्षांत घेण्यासारखी आहे.
 मुसलमानांनीं आपल्या जिंकिलेल्या प्रजेवर जीझिया कर बसविला, ही गोष्ट खरी आहे; पण तो एकट्या हिंदू या विविक्षित जातीवर अथवा फक्त हिंदु- स्थान देशांतच नसून अरबांनी सीरिया प्रांतांतील ख्रिस्ती लोकांवरही तो बसविला होता; मराठ्यांनी चौथाई सरदेशमुखी या कराच्या रूपाने जिंकिलेल्या प्रदेशावर आपला शह बसविण्याची पद्धति सुरू केली होती, आणि इंग्रजांनींही एतद्देशीय राजे रजवाड्यांशी तैनाती तह करून व त्यांच्या दरबारी आपला एक एक प्रतिनिधी ठेवून हिंदुस्थानांत आपलें सार्वभौमत्व प्रस्थापित केले आहे; त्या प्रमाणेच इंग्रजांच्या राज्यांतहीं असा इतर भेदमूलक प्रकार दाखवितां येण्या सारखा आहे; परंतु राजकीय दृष्टया त्या त्या काळास व परिस्थितीस अनुसरून योग्य वाटणारी राज्यपद्धति, ज्या विजयीं राज्यकर्त्यास आंखून काढावयाची असते तो, ती, आपल्या सोई प्रमाणेच आंखून काढीत असतो, हे उघडच आहे:- म्हणजे अशा प्रकारच्या भेदमूलक राज्यपद्धति बद्दल दोषच द्यावयाचा असेल तर तो - इंग्रजांची राज्यपद्धति अधिक सुधारलेली म्हणून त्यांनां वगळून-मुसलमान व मराठे यांनांच फक्त द्यावयाचा नसून मुसलमान, मराठे, व इंग्रज, या तीघांनांही दिला पाहिजे, अथवा त्या पैकी कोणासहीं न दिला पाहिजे, हें स्पष्ट होतें; आणि अधिक स्पष्ट म्हणावयाचे म्हणजे हिंदू-मुसलमानांचे पूर्व वैभव नष्ट झालं म्हणूनच त्यांच्या प्रत्येक गोष्टीला व राज्यपद्धतिला नावे ठेवणं, आणि इंग्रज हिंदुस्थानचे राजे झाले, आज सार्वभौम सत्ताधीश आहेत, म्हणून त्यांच्या प्रत्येक राज्यपद्धतिचे व राजकीय कृत्याचे समर्थन करीत राहणें, केव्हांही न्यायाचे ठरणार नाहीं; तर निःपक्षपातीपणानें, हिंदू, मुसलमान, व इंग्रज यांच्या राज्यपद्धति संबंधी त्या त्या