Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५७)


विठोबा व अहंमदाबादेच्या मालिक हसन या साधु पुरुषाच्या कचरेस नरसोबा अशी नावे आहेत; त्या प्रमाणेच कल्याण जवळ मलंगड या नांवाचा एक किल्ला असून त्यांत एक पिराचे स्थान आहे; व त्या स्थानाचे " मुजावर ( झाड लोट करणारे ) कल्याण येथील केतकर या उपनांवाचे चित्तरावन ब्राह्मण आहेत; अनेक हिंदू लोकांत ताबूत करण्याची, पोरास नवस करण्याची, व नाडे बांधण्याची चाल असून उलटपक्षी-मूळच्या हिंदू मधून बाटलेल्या कित्येक मुसलमानत हिंदूंची नांवे ठेवण्याची, हिंदू सण पाळण्याची, लग्न वगैरे मंगल प्रसग कुंकुम तीलक अथवा कुंकुवाचा चांदला लावण्याची आणि हिंदूचे देवांचे टांक ही घरात ठेवण्याची पद्धत आहे; मुसलमानांतील कित्येक फकीर हिंदू साधूम्रपणें ब्रह्मचर्य बताने राहतात; कित्येकांत, भगवी वस्त्र परिधान करून भस्म लावण्याची पद्धत आहे; आजही कित्येक हिंदू, व ब्राह्मण, मराठे, सरदार जहागिरदारांच्या बागेत, वाड्यांत, मळ्यांत, अथवा इतर स्थावर मिळकतींत, पीराचे स्थान अस्तित्वात असल्याचें, त्या ठिकाणीं मुसलमान मुजावर ठेवून त्या स्थानाची स्वतः सन्मान पूर्वक अत्यंत काळजी घेत असल्याचे त्या स्थानास नेहमीं अतीशय आदर दाखवून विविक्षित वारी नियमितपणानें त्या स्थानाचे दर्शन घेण्यात जात असल्याचें, त्या ठिकाणी उरूस भरून नुसलमान फकीरांना जेऊ घालीत असल्याचें--दृग्गोचर होत आहे; त्या प्रमाणेच शिंदे, होळकर, व गायकवाड, दे पीरांचे भक्त असून शिंद्यांच्या दौलतीत तर, मनसूर शहावली या नांवाच्या प्रसिद्ध साधु पुरुषाच्या कृपेनें महादजीस सरदारकी मिळाली म्हणून, " फकीरी दौलत असे म्हणण्याचा प्रघात पडला आहे; मुसलमानी राज्यांत त्या लोकांनी कित्येक हिंदूंना मोठमोठ्या अधिकाराच्या जागा दिल्या,तशाच दिँदनींही त्यांच्या राज्यांत मुसलमानांना दिलेल्या आहेत; व हिंदू लोक ज्याप्रमाणें मुसलमानार्शी इमानानें वागले, त्याप्रमाणेच मुसलमान लोक हिंदू लोकांशों इमानानें वागल्याची उदाहरणे आहेत; शिवाजीच्या वेळ त्याच्या जवळ स्वतंत्र मुसलमानी सैन्याचें पथक असून त्यावरील अधिकारीही मुसलमान होते; त्याप्रमाणेच शिवाजीच्या आरमारावरील मुख्य अधिकारीही मुसलमान होता; पण त्यांनींच जंजिरेकर व इतर मुसलमानी राज्यों बरोबर युद्ध प्रलंग करून शिवाजीव्या उद्दिष्ट कार्यात महत्वाचा हातभार लाविला आहे:
"