Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५६ )


आत्मा शांत करण्याच्या भावनेने त्यांना पाणी देत असतात; पण तूं असल • दिवटा पितृभक्त चिरंजीव जन्मास आला आहेस कीं, आपल्या प्रतिबंधांत ठेविलेल्या प्रत्यक्ष पित्यालाही जिवंतपणी सुद्धा पाणी मिळू नये, असा बदोवस्त करितोस ! तस्मात् धन्य आहे तुझी !! आणि तुझ्या या पितृभक्तिची !!!
 हिंदुस्थानांत मुसलमान लोक आल्यानंतर हिंदू लोकांच्या निकट सहवासा 'मुळे कित्येक वाटलेले हिंदू अथवा त्यांचे वंशज कित्येक हिंदू आई पासून जन्मास आलेले व त्यांचे वंशज, कित्येक धर्मातर न करिता मुसलमानी राज्याशी स्वामिनिष्ट राहून त्या राज्याचे आधार स्तंभ असलेले, व त्यांचे वंशज वगैरे निरनिराळ्या कारणांनी घडलेल्या निकट सहवासामुळे हिंदू लोकानां व हिंदूधर्माला मोगल बादशहा किती आदरयुक्त दृष्टीने पहात होते, याचे वरील दहाजहान याची गोष्ट. हे एक उदाहरण आहे आजही हिंदुस्थानांत विशेषतः कोकण व महाराष्ट्र या भागांत कित्येक मुसलमानांत त्यांच्या बायका. हिंदू स्त्रियांसारखी लुगडी चोळा वापरीत असून, त्यांच्यांतील पुरुष मंडळी धोतरें व पागोटी वापरताना, आणि ओळखवाही येणार नाही इतक्या शुद्ध व सरळ रीतीने त्यांच्या सहवासाची झालेली मराठी भाषा बोलताना आढळतात; मुसलमान लोकति, मद्यपानाची बंदी तर त्यांच्या धर्माचिताना केलेली आहे. पण तशी मांसाहारासंबंधी नसून मुद्रां कित्येक मुसलमान मत सेवन न करणारे आहेत; पैगंबराच्या वंशापासून झालेल्या मुसलमानास "सत्य" असे म्हणतात; आणि त्यांच्यातही हिंदू मधील उच्च जाती प्रमाणेच मुलींच्या पुनर्विवाहास बंदी असून ते पुनर्विवाह करीत नाहीत; वास्तविक म्हणावयाचे म्हणजे " मुसलमान हा सर्व साधारणतः एक समाज असून, त्यांच्यात हिंदू सारखे जातिभेदाचे प्रकार नसावेत असे वरवर दिसते; परंतु त्यांच्यांतही ते नालबंद, महात, दर्जी, कागदी,हिंदुस्थानात आल्यानंतर, हिंदू प्रमाणेच तांबटी, तांबोळी, नट, कुजडे, सारवान बरे जाती उत्पन्न झाल्यापासून त्यांचा वेटी व्यवहार आपापल्या जाती ब. देर होत नाहीं हिंदू मुसलमानांच्या निकट सान्निध्याची द्योतक म्हणून या ठिकाणी, उदाहरणासह थोडीसी माहिती देता येण्यासारखी आहे: अहमदनगर अहमदाबाद ही दोन्हीही शहरें पूर्वी मुसलमानी अमादानीत राजवातीची ठिकाणे होती; यापैकी नगरच्या पोरास