Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२५५)


“मी स्वतः जरी दारू पितो तरी माझ्या साम्राज्यांत कोणीही मद्यपान करू नये" अशी त्याची इच्छा असून तशा आशयाचा त्यानें सक्त हुकुम ही काढिला होता; बादशहा शहाजहान-- आपल्या अत्यंत आवडत्या राणीच्या स्मरणार्थ जगांतील अलौकिक म्हणून गणला गेलेला आग्रा येथील " ताजमहाल " बांधणारा प्रेमी व प्रजा प्रीय शहाजहान-- याच्यावर त्याच्या प्रजेची इतकी भक्ति होती की तो आपल्या चिरंजिवाच्या-बादशहा आलमगीर उर्फ अवरंगझेब याच्या प्रतिबंधांत पडल्या- चर मुद्धा त्याची हिंदू प्रजा त्याचे दररोज नियमानें सकाळी दर्शन घेण्या करिता आग्रा येथील किया पुढे जाऊन उभी रहात असे; आणि शहाजहान हा ही दररोज नियमानें समोर सज्जातील खिडकींत येऊन त्यांना दर्शन देत असे; उलट- पक्षी शहाजहानच्या मनावरही हिंदू धर्मातील, व हिंदू लोकांतील कित्येक भावना, व कल्पनांचा पुष्कळच खोल परिणाम झालेला होता; शहाजहान-यांस अवरंग झेबाने कैदेत दविल्या नंतर, स्वतःच्या इच्छेस त्याने आधीन व्हावें म्हणून, अवरंगझेबानें कांहीं काळपर्यंत, तशा स्थितीत, आपल्या रक्षकांकडून त्याचा अनेक वेळा अपमान करविला, आणि सदत्राण व अंगांत घालण्याचे कपडे या सारख्या क्षुल्लक बाबतीत ही त्यानें शहाजहान याचें जीवित कष्टमय करून सोडिल; पण इतके करून ही आपला पिता शहाजहान हा आपल्या इच्छेन्या आधीन होत नाही, असे पाहून, ज्या विविक्षित ठिकाणाहून शहाजहान यांस पिण्याचे पाणी दररोज येत असे, त्या विविक्षित ठिकाणचें तें पाणी अवरंगझेवानें बंद केलें; त्यावेळी शहाजदान यांस अतीशय वाईट वाटले; हिंदूधर्म, हिंदू लोकांच्या धार्मिक भावना व कल्पना, स्वर्गस्थ वाडवडील, माता, पिता, व पितर, मातर, बांची आठवण ठेवण्याची व त्यांना मान सन्मान देऊन त्यांच्या संबंधी पिढयानुडिया आदर बाळगत राहण्याची हिंदू लोकांची पद्धति, त्या संबंधीचे निरनिराळे धार्मिक विधी, आचार, व सांप्रदाय, वगैरे गोष्टी त्याच्या डोळ्यापुढ उन्ना राहिल्या; आणि त्यानें अवरंगझेबास एक अत्यंत दयद्रावक संदेश पाठविला; व त्यांत असा उल्लेख केला कीं, (See J Sarkar's Auranz:b Vol. II. हिंदू लोक तर आपल्या वाडवडि लास, -- पिचापितरास, मातामातरास, व आपल्या निकटच्या लहानमोठ्या मनुष्यास त्यांच्या नृत्यूनतरही वार्षिक व मासिक श्राद्ध पक्ष करून, त्यांचा