Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५४ )


मुसलमान, मोंगल, तुर्क, तार्तार, अरब, वगैरे लोकांच्या ही कर्तुत्वाची थोतक नाहीत, असे कोण म्हणेल १ हिंदू प्रमाणेच मुसलमान लोकांतही हिंदुस्थानांत अनेक नामांकित राज्यकर्ते, योद्धे, मुत्सद्दि, ग्रंथकार, कवी, वगैरे निर्माण झाले असून कित्येक राज्यकर्त्यांची राज्यव्यवस्था, व राजनीतिविशारदता ही खरो- खरीच अत्यंत अलौकिक अशोच होती; त्यांनी हिंदुस्थानांतील निरनिराळ्या भागांत आपली राज्ये स्थापन केल्यामुळे त्यांचा हिंदू लोकांशीं अधिक अधिक निकट संबंध येत गेला; त्यामुळे, आणि नुसलमानापैकी पुष्कळ तर चाटलेले हिंदूच मूळचे असल्यामुळे, त्यांचा कट्टा धर्माभिमान व त्यामुळे बनलेला कडवा स्वभाव, पुढे पुढे विशेषच शिथिल व सौम्य बनत गेला आणि ते हिंदू प्रजेस प्रेमानें बागवू लागले; शिवाय त्यांतील कित्येकांना आपण हिंदू लोकांमध्ये परकीय आहोत. आणि त्यामुळे त्यांच्याशी सख्य ठेवण्यांतच आपणास व आपल्या राज्यास स्थैर्य व बळकटी येणारी आहे ही जाणीव होती; त्याप्रमाणेच मुसलमान 'राज्यकर्त्यांना व इतर सरदार वगैरे मंडळीनाही हिंदू स्त्रियाशी लग्न करण्याची आवड असून सेलीम व शहाजहान हे दोन्ही ही मांगल बादशहा हिंदू-आईपासून झालेले मुलगे होते; + सेलीम व शहाजहान है उभयतांही आपल्या प्रजेस "विशेष प्रीय असून, अकबराचीच राज्यनीति त्यांनी कायम ठेविली होती; वाद- शहा जहांगीर हा विषय व व्यसनी होता; सखी आणि शराब-नूर जशन आणि दारू यांच्या शिवाय त्याला दुसरे काहीही दिसत नव्हते; पण दारू पिण कितीं घातक आहे, याची त्यास पूर्णपणे जाणीव असून, आपणास हे दुष्ट व्यसन जडल्या-

चद्दल दारूच्या धुंदीत नसतांना त्यास वाईट वाटत असे; पश्चात्ताप होत असे, आणि



 +उत्तर प्रमाणेच दक्षिणेही मुसलमान राज्यकर्त्यांना व सरदार वगैरे मंडळींनां हिंदू स्त्रियाशी लग्न करण्याची आवड होती; उदाहरणार्थ, विजापूरच अदिलशाही राज्य स्थापन करणारा प्रसिद्ध बादशहा आदिलशहा- उर्फ अबुल् मुज्झर मुफ आदिलशहा यानें मुकुंदराव या नांवाच्या एका शूर मराठे सरदा- राच्या बहिणीशी लग्न केले होते; तिचे मुसलमानी नांच बुबुजीखान हे असून तिच्यावर अदिलशहाची अतीशय मीती होती; हिच्या पोटी त्यास इसमईल या नांवाचा एक मुलगा झाला व तो अदिलशहाच्या मृत्यू नंतर इ० सन १५१० -मध्ये गादीवर आला.