Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९५३)


आहे, परंतु स्थालाभावामुळे एवढयावरच निर्वाह करून पुढील विषय विवे- चना कडे वळणे भाग आहे.
 तात्पर्य, अगदी थोडक्यात म्हणावयाचे म्हणजे हिंदुस्थानची वैभव- संपन्नता, यामुळेच या देशावर, अरब, तासीर मोगल, वगैरे लोकांच्या, तैमूर- लेख नादीरशहा, अहमदशहा वगैरे बाउली सेनानायकांच्या व युरोपियनांच्याही स्वान्या झालेल्या आहेत; व युरोपियन लोक व्यापाराकरितां म्हणून आलेले ' आहेत; मुसलमान व मोंगल लोकानी या देशात सत्ता मिळविली आहे; आपली राज्य स्थापन केलीं आहेत: इताली, स्पेन, पोर्तुगाल, आस्त्रिया, हॉलंड, इंग्लंड, व फ्रान्स, वगैरे देशांतील लोक व्यापारा करितां आले आहेत; आणि हिंदुस्था- नांतील राजकीय रंगभूमीवर इंग्लंडने विजय संपादन करून ब्रिटिश लोक हे हिंदुस्थानचे सार्वभौम राज्यकर्ते बनलेले आहेत; याच हिंदुस्थानांतील संपत्ति- .मुळे ब्रिटिश साम्राज्य आज वैभवसंपन्न बनले आहे; याच हिंदुस्थानातील संपत्ति मुळे इंग्लंडच्या राष्ट्राला गेल्या शतकांत आपले व सर्व युरोपचे संरक्षण करितां आले आहे; याच हिंदुस्थानातील संपत्ति नेपोलियनच्या नशिवाचा अखेरचा निकाल लागलेला आहे: याच हिंदुस्थानांतील तीन इंग्रजी " म " कारांनी मेन मनी, आणि म्यूनीशन, यांनी ( Mer, Money and Munition म्हणजे सैन्य, संपत्ति, व दारूगोळा, यांनी) इंग्लंडला जर्मनीच्या सुलतानी सत्तेस चिरडून टाकून, इग्लिश मुत्सद्द्यांच्या शब्दांत म्हणावयाचे म्हणजे अप्रतिहत व अनियंत्रित अशी अन्यायी सत्तेची जर्मन महत्वाकांक्षा नामशेष करून आशिया युरोपच फक्त नव्हे तर सर्व जगाचेंही जर्मन केझर पासून संरक्षण करिता आलेले आहे, आणि याच हिंदुस्थान देशामुळे इंग्लंडच्या राष्ट्राचे वैभव वृद्धिंगत होत जाऊन सर्व जगति इंग्लंडचे राष्ट्र अत्यंत वैभवसंपन्न व बलाढ्य म्हणून गणले गेलेले व प्रसि- द्धीस आलेले आहे; नेपोलियन व केसर यांच्या नशिबाचा अखेरचा निकाल लागून त्यांच्या ऐश्वर्यावर कायमचा पडदा पडलेला आहे, आणि ब्रिटिश राष्ट्रास 'विजय प्राप्त होऊन सर्व जगभर त्या राष्ट्राचा जयजयकार झालेला आहे.
 हिंदुस्थानांत मुसलमान लोकांनी आपली राज्य स्थापना केलीं, व मोंगलांनी आपली बादशहात निर्माण केली. ही गोष्ट, आणि जगाच्या इतिहासांत त्यांनी नमूद करून ठेविलेली अनेक पराक्रमाची कृत्यें, हीं