Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५२ )


तळाचें पाणी उत्कृष्ट रीतीनें खेळविलेले होतें; या बादशहाच्या कारकीर्दीत मोंगली राज्याचे बावीस मुभं असून साम्राज्याचा वसूल पहिल्यानें बावीस व पुढे बत्तीस, कोटी पर्यंत वाढला होता, व शहाजहानपाशी इतकी अपार संपत्ति होती की, मंडेस्लोच्या म्हणण्याप्रमाणें ती, तीस कोटी पोंड अथवा साडेचार अब्ज रुपयाची होती. यावरून प्राचीन मोंगली व मुसलमानी वैभवासंबंधों योग्य कल्पना होईल., त्याप्रमाणेच शहाजहान बादशदाचे " मयूर सिंहासन " ही तसेच अत्यंत मौल्य-) वान होते; अकबर बादशहा पासून बादशाही जवाहिरखान्या मध्ये संचय केलेल्या अनेक मौल्यवान रत्नांमधून अजमासे ८६ लाख रुपये किंमतीची निवडक रत्ने आणि एक लक्ष तोळे सोने मिळून हे सिंहासन बनविलें होतें. है मयुरासन बेबादल खान या सरदाराच्या देखरेखीखाली कसबी सोनारांकडून तयार करदिलेल असून तें संपूर्ण तयार होण्यास सातवें लागली; या सिंहासनाची लांबी सव्वा तीन यार्ड, रुंदी अडीच यार्ड, व उंची पांच बार्ड होती. या सिंहासनांत चोहोकडें. रत्नें गुंफिलीं असून त्यास बारा कोन व बाराच खांब दिलेले होते; सिंहासनावर एक लहानसे कृत्रिम झाड तयार केलेले असून प्रत्येक खांबाच्या शिखरावर दोन दोन मोर बसविले होतें; सिंहासनावर चढून जाण्यास तीन रत्नखचित पाय-या केलेल्या असून त्याच्या बाकीच्या अकरा बाजू कठडे बसवून बंद केलेल्या होत्या; व त्याच्या आतील बाजूस एका फारशी कवीची वीस कवनें कोरिलेली होती. हे प्रसिद्ध मयूरासन, व कोहिनूर हिरा, इतर छुटी बरोबर नादीरशहानें पुढे इराणांत नेला. शहाजहान बादशहास इमारती बांधण्याचा विशेष नाद असून त्याने अनेक, प्रसिद्ध इमारती बांधविल्या आहेत: या बादशहाच्या स्वारीचें व दरबारचे वैभव ही विशेष वर्णनीय असून, बादशहाच्या अंगावर नेहमी घालण्याच्या जडजवाहीरा- चीच किंमत दोन कोट रुपये होती; त्याप्रमाणेच त्याच्या जवळ मंत्र जप- ण्याच्या दोन माळा होत्या, त्याचीच नुसती किंमत वीस लाख रुपये होती; या बादशहानें आपल्या कारकीर्दीतील पहिल्या वीस वर्षात निब्बळ दानधर्म म्हणून साडेनऊ कोट रुपयांची खैरात केली, व अडीच कोट रुपये इमारती बांधण्याकडे खर्च केले; साडेनऊ कोटी रुपये दानधर्म करणाऱ्या बादशहाचे केवढें वैभव असेल याची नुकती कल्पनाच करणे सुद्धां कठिण आहे; हिंदुस्थान देशांतील अशा प्रकारचें वैभव व संपत्ति या संबंधी आणिखीही पुष्कळ माहिती देता येण्या सारखी