Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५१ )


महिन्यामध्ये पूर्ण झालो, व आफ्रिडीच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या पूर्तयेपर्यंत एकंदर खर्च नऊ कोटी सूत्रा लक्ष रुपये आला; ( कित्येकांच्या मतें हीं रक्कम पन्नास लाख रुपये आहे. ) या इमारतीचे काम सतत बारा वर्षे चालू असून ती बांधून पूर्ण करण्याकरितां बीस हजार माणसे दररोज काम करीत होती. ही इमारत आग्रा शहरापासून अजमासे तीन मैलांवर यमुना नदीच्या पश्चिम तीरांवर असून आपल्या अवर्णनीय व अप्रतिम सौंदर्यामुळे जगातील सर्व इमारती मध्ये ती श्रेष्ठ व प्रथम पद पावलेली आहे. ही इमारत पुरो: झाल्या नंतर ता० २८ रोजी, म्हणजे आपल्या प्रीय राणीच्या बाराव्या वर्षाच्या मृत्यु दिवशी शहाजहान, यानें ताजमहालामध्ये प्रथम प्रवेश केला, आणि. एक लाख रुपये उत्पन्नाची तीस गांवें त्यानें ताजमहाल, व त्या सभोवतालील सराया, दुकानें, बागा, व त्यांत राहणारे साधू फकीर, यांच्या खचकिडे स्वतंत्र रीतीनें लावून दिली. त्या प्रमाणेच फत्तेपूर शिक्री, अहंमदनगर, गोवळकोंडे, विजापूर, दिल्ली, गुलबर्गा वगैरे अनेक ठिकाणच्या मशीदी व इमा- रती, शिकंदरा येथील अकबराची कचर व आग्रा शहराजवळील इतिमाद् - उद्दौल्याची कबर, वगैरेही स्थळें विशेष प्रेक्षणीय व मुसलमानी राज्य- कर्त्याच्या आणि मोंगली साम्राज्याच्या पूर्व वैभवाची योतक आहेत. शिवाय धन्या नवाबांनी आपल्या राज्यांत बांधिलेल्या कित्येक इमारती, व विजापूर- करांनी बांबिलेल्या बालेघुमट, जुम्मामसीद, गगनमहाल, शहानुरूज, महाचुरूज वगैरे इमारती जगति अत्यंत प्रेक्षणीय म्हणून गणल्या गेल्या आहेत; त्याप्रमा- पेंच हल्लींचें दिल्ली शहर हैं यमुना नदीच्या तीरावर शहाजहान बादशहानेंच- बसविले असुन तें शहर बांधण्यावें काम सतत दहा वर्षे चालललें होतें; याच शहराला मुसलमान इतिहासकारांच्या ग्रंथांतून शहाजहानाबाद हे नांव दिलेले आहे; हैं शहर आग्रा येथील ताजमहाल प्रमाणेच यमुना नदीच्या पश्चिम तीरावर असून तेथील चांदणीचौक, जुम्मामशीद, मोतीमशीद, दिवाणीआम, दिवाणीखास, घुसलखाना वगैरे शहाजनानें बांधिलेल्या इमारतीही अतीशय प्रसिद्ध व प्रेक्षणीय आहेत. इतकंच नव्हे तर शहाजान बादशहाच्या राजवाडया सारखा वाडा सर्व पृथ्वींत दुसरा नाहीं, असें मिस्तर फर्ग्यूसन या शिशास्त्रज्ञाचे मत आहे. या वाडयाच्या भिंतीवर सुंदर रंगित चित्र काढिली असून वाढया सभोवती साठ फूट उंचीचा, व दीड मैल घेराचा कोट होता, व वाडयांतील सर्व भागांत