Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५०)


होय, असें म्हटलॅ; त्या बरोबर मुस्साज-महल म्हणाली – देवानें आपणास पुष्कळ मुळे दिली आहेत, आणि आपला नांवलौकिक चालविण्यास र्ती पुरेशी आहेत; तेव्हा आपल्या घरात सावत्र भाव उत्पन्न होऊन तटा भांडणे वाढूं नयेत म्हणून मी आपणास अशी विनंती करिते कीं, मी कालवश झाल्यावर आपण पुन्हा दुसरे लग्न करू नये; आणि दुसरी विनंती ही आहे कीं, आपणा उभयतांच्या प्रतीचे स्मारक यावच्चंद्र दिवाकरौ रहावे, म्हणून अशी एक अलौकिक इमारत बांधा, की जगात तिच्या तोडीची इमारत पूर्वीही कर्धी बांधिली गेली नाहीं, व पुढे ही कधीं बांधिली जाणार नाहीं; इतके बोलल्यावर ती पुढे प्रसुत होऊन लागलीच मृत्यू पावली; शहाजहान याने आपल्या प्रीय पत्नीस दिलेल्या अभिवचना प्रमाणे पुन्हां लग्न केले नाहीं, व मुम्ताज महल हिचे स्मारक म्हणून त्यानें जगातील अत्यंत प्रसिद्ध व श्रेष्ट अशी "ताजमहाल" हीं इमारत आग्रा येथें वांधिलीं; या इमारतीस इ० सन १६३१ च्या प्रारंभी सुरवात

होऊन ती पुरीं होण्यास बारा वर्षे लागली; ती इ० सन १६४३ च्या ज्यानेवारी



 *पातशहानाम्यांत वरील हकीकतीहून निराळी हकीकत दिली आहे; आणि वरील हकीकत सांगोसांगीची असून ती पाटणा खुदाबक्ष ग्रंथ संग्रहालया- तील कासीम अली आफ्रीडी याच्या आत्म चरित्रातील आहे. पातशहा- नाम्यात असे लिहिले आहे की, मुम्ताज महल हिला जेव्हा असे कळून चुकले की, आता आपण जगत नाहीं, त्या वेळी तिनें जहान् आरा ( जगाला भूष- त्रिणारी; ही शहाजहान व मुम्ताजमहल यांची बशील कन्या असून तिच्यावर शहाजहान याचं अतीशय प्रेम होते.)हिला बादशहाकडे पाठवून त्यास ताबडतोब आपणाकडे बोलावून घेतले, आणि शहाजहानदी लागलीच त्या ठिकाण मोठ्या काळजीने धांवत आला. उभयतांची दृष्टाहट झाल्यावर तिनें मुलांचा सांभाळ करण्याविषयीं बादशहास विनंती केली, आणि आपण परलोकवास पत्करिला. त्यानंतर बन्हाणपूर समोर तापी नदीच्या काठी एका चागत प्रथम तिचे दफन झाले, व त्या नंतर, एका वर्षांनं, इ० सन १६३२ मध्ये ता० १. दिजंबर रोजी तिचे कलेबर आग्रा येथे नेण्यांत आले. त्यावेळी बरोबर शहाजादा मुजा हा असून तो आपल्या मातुश्रीच्या शवासह ता० २९ दिजंबर रोजीं, अठ्ठावीस दिवसानों आग्रा येथे येऊन पोहोचला.