Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७)

आणि त्यांतील लहान लहान सूक्के अथवा कवने ते यज्ञयाग वगैरे समारंभाच्या प्रसंगी म्हणू लागले; त्यावेळी लेखनकला अवगत नसल्यामुळे, तीं सूक्तं अथवा कक्ने गुरुमुखांतून ऐकून पाठ करण्याची वहिवाट होती; त्यावरून त्यांना ' श्रुति हैं नामाभिधान मिळाले व पुढें हीं सर्व सूत एकत्र करून त्यास 'संहिता म्हणजे एकीकरण. हे नांव देण्यात आले. अशा रीतीने आर्य पंडितांनों ईश्वर स्तुतिपर असा जो एक प्रचंड ग्रंथ इसवी सनापूर्वी एक हजार वर्षांच्या नुमारास पूर्ण केला त्यास ऋग्वेद संहिता असे म्हणतात. या ग्रंथांत १०२८ लहान लहान ईश्वरस्तुतिपर सुतें अथवा करने असून त्यांच्या १०५८० ऋचा आहेत व या वेदtतील वर्णनावरून तत्कालीन आर्यलोक सुधारलेले होते, असे दृष्टोत्पत्तीत येत आहे. या काळांत जातिभेद अस्तित्वात नव्हता; प्रत्येक कुटुंबांतील वडील मनुष्य हा त्या घरांतील ' मुख्य ' म्हणून गणला जात होता, व त्याच्या प्रमाणे कुटुंबांतील सर्व मंडळी वागत होती. वेदकाला पूर्वी युद्धांत पाडाव करून आणिलेल्या स्त्रीबरोबर लग्न करण्याचा चाल होती. व अशा स्त्रियांचा सामाजिक दरजाही फारसा माननीय नव्हताः परंतु वेदकालापासून या विवाहपद्धतीत फरक पडला. दोन कुटुंबांमध्ये करार होऊन परस्परांत विवाहसंबंध बडून येऊ लागले, व स्त्रियांची योग्यता वाढून त्यांना समाजात व कुटुंबांत विशेष मान मिळू लागला. याच काळांत अतीसारख्या विद्वान् स्त्रिया निर्माण झाल्या आणि वेदांतील उत्तम व प्रगल्भ विचारांच्या ऋचापैकी कांहीं ऋचा स्त्रियांनी रविल्या. या काळांत सती जाण्याची चाल नव्हती; युद्धप्रसंगी आर्यलोक घोड्याच्या रथांत बसून युद्धे करीत. व आपल्या बचावाकरितां अंगांत चिलखतें, व डोकीस शिरस्त्राणे चढवीत; त्यांचे लढाईचे मुख्य शस्त्र धनुष्य-बाण हैं असून प्रसंगीं तरवार, भाला व परशु या शस्त्राचाहि ते उपयोग करीत; त्याप्रमाणेच शांततेच्या वेळी ते शर्यती लावणे, ढोलकी वगैरे बायें वाजवून नृत्य करणे, वगैरे साधनांनी आपली करमणूक करून घेत ते स्थायिक वस्ती करून व शेती नांगरून रहात, व आसपासच्या गांवी व्यापारवेदाही करीत. या वेळी आर्य लोकांची संपात हागजे, गुरे ढोरें हीं असून शेतीत लागणारे बैल, ग शरीरजोपासनेस आवश्यक असलेले दूध, तूप वगैरेंची पैदास गाईपासून अस- ल्यामुळे गाई यांनां विशेष नान व महत्त्व होते इतकेंच नाही तर संपत्ति मोज-