Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२४९ )



करितां उभारलेले तंबू लाल रंगाचे असून इतर मंडळींचे तबू पांढऱ्या, हिरव्या वगैरे निरनिराळया रंगाचे होते; त्वारीच्या मुक्कामावर, राजधानी- तील व्यवस्थेप्रमाणेच मोठमोठ रस्ते काढिलेले असून, त्यांच्या दोन्हीं बाजूस दुकानें रांगेने वतविलों होतीं. छावणी कोणत्या पद्धतीने व व्यवस्थेने करावयाची याबद्दलचे नकाशे ठरलेले असून मध्येच कोणाचा कोठें मुक्काम व्हावयाचा हे कळण्याची सोय केली होती; ( ऐने-अकबरीत असे कित्येक नकाशे दिले आहेत ) स्वारीचा मुक्काम दररोज हलविला जाऊन थोडे थोडे मैल पुढे जात असे; परंतु त्यामुळे टरीव व्यवस्थे मध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा अथवा अव्यवस्था होत नसे आणि सर्व सामानाचे तीन तीन चार चार जोड असून मुक्कामाची तयारी चार तासांत होत असे; " यावरून बाद - शाही वैभवाची व त्यांच्या थाटांच्या स्वान्यांची कल्पना करितां येतें; त्याप्रमा- च बादशहा शहाबुद्दीन महमद खुर्रम उर्फ शहाजहान, याच वैभवही डोळे दिपविणारे असून त्याने आग्रा येथे बांधिलेली प्रसिद्ध इमारत " ताज महाल " ही सर्व जगांत अप्रतिम सौंदर्य व असाधारण कलाकौशल्य यामुळे अत्यंत ष्ट पद पावलेली आहे: या ताजमहाला संबंधी थोडक्यात अशी हकीकत आहे -कीं, ताज महाल" हो इमारत एका स्त्रीचें स्मारक म्हणून बांधण्यांत आली आहे; बादशहा शहाजहान याची प्रीय रात्री अर्जुमंद बानू उर्फ मुम्ताज-महल् ही इ० सन १६३१ मध्ये ( ता० ७ जून रोजीं) बन्हाणपूर येथे, प्रसुती वेदनांनीं मृत्यू पावली; या बाईस एकदर चौदा मुलें झालीं, व शेवटच्या प्रसूतीच्या वेळीं या बाळंतपणांतून आतां आपण जगत नाहीं, अशी तिची खात्री झाल्यावर तिनें | बादशहास बोलावून आणून मोठ्या दुःखाने व कळकळीने त्यास सांगितलें कीं, "गर्भातील मुलाचे रडणें त्याच्या आईने ऐकिलें म्हणजे ती जगत नाहीं असे म्हणतात; आणि तसा गर्भातील बालकाचा रुदन स्वर माझ्या कानी आला, म्हणून माझा मृत्यू आता नजदीक आला आहे, असे मला वाटतें. तरी माझ्या हातून आजपर्यंत कोणतीही चुकी अथवा आगळीक झाली असल्यास तिज बद्दल मला क्षमा करा; आजपर्यंतच्या आपल्या सर्व सुखदुःखांत मी आपली वाटेकरीण होते, पण आता आपला जाणे प्राप्त झाले आहे; म्हणून आपणा गोष्टी मागून घेते, त्या आपण, कृपा कायमचा सहवास सोडून मला निघून जवळून यावेळीं मी शेवटच्या दोन करून देतो असें म्हणा; बादशहानें