Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२४८ )


थ्याशीं बादशहाची दृष्ट काढण्यांत आली; यावेळी त्याने केलेला पोषाख अतीशय मौल्यवान असून त्याच्या अंगांत जरीचा एक भव्य झगा होता व त्याचें सर्वांग किंमती हिया मोत्यांनी भरलेले होते; त्याच्या नौकरांनी पुढे येऊन त्याची ढाल तरवार बांधिली, आणि धनुष्य वाण लटकावून दिले. त्यानंतर तो चार घोड्याच्या गाडीत बसला. बादशहाची गाडी हांकणारा मनुष्य कोचमन-इंग्रज असून त्याचा पोषाखही रत्नखचित होता. बादशहाच्या दोन्ही बाजूस दोन परिचारक उभे असून ते त्याच्यावर चवन्या वारीत होते. या बादशाही स्वारींत सर्वांपुढे वाद्ये असून त्याच्यामागे भरगच्चो सामान घातलेले नऊ घोडे रिकामे चालले होते; त्याच्या पाठीमागे काही सुंदर पालख्या होत्या; त्या नंतर एक विलायती बगी असून तीत " सौंदर्याची तारका " नूरजहान ही बसली होती; तिच्या स्वारीच्या मागें बादशहाचे दोघे धाकडे मुलगे, गाडीत बसलेले असून त्यांच्या मागे मौल्यवान अलंकार भूषणांनी सजविलेले सुंदर वीस हत्ती चालत होते; व त्यांच्या मागे सरदार मंडळी पाय चालली होती; सर्व रस्त्यावर सहाशे हत्तींचा पहारा असून प्रत्येकावर निशाण व बंदुका होत्या; स्वारीचा रस्ता पाण्यानें भिजविलेला होता; या स्वारींत कोणासही बादशहाची भेट घ्यावयाची असल्यास त्यास फार लांब पासून पायीं यावे लागत असे; बादशाही स्वारी राजवाड्यांतून निघतांना जहां- गिरने आपला मुलगा खुश्रु याची भेट घेतली व त्यास आपणा बरोबर वेलें; बादशहाच्या मुक्कामाच्या ठिकाणी सर्वानां राहण्याकरितां तंबू लाविलेले होते; त्यति खुद्द बादशहाच्या तंबूची शोभा अवर्णनीय होती. त्या तंत्रच्या सभांतों अर्धा मेल परिधाच्या कनातीं लाविलेल्या असून नाक्यावरील दिंडी दरवाजा श्रृंगारुन विशेष शोभिवंत केला होता. राजवाड्या प्रमाणेच दरवारची वगैरे सर्व व्यवस्था तंबूंत ही केली होती; आणि जनानखान्या करितां मागील बाजूनें निराळा स्वतंत्र रस्ता टेविला होता. दरवाज्यांतून आत शिरल्यावर रस्त्याच्या दोन्हं, बाजूस सरदार लोक रांगेने उभे होते; त्यामधून जहांगीर बादशहाची स्वारी आपल्या तंबूत गेली. या छावणींतील बादशाही तंत्र मधील एकंदर व्यवस्था थेट राजवाडयांतील व्यवस्थे प्रमाणंच होनीं. बादशहा शिवाय इतर मंडळींचे ही तंबूं लाविण्यात आले असून या स्वारोंतील सर्व मंडळीच्या मोठ्या वस्ती मुळे एक नवे शहरच आहे काय, असा भास होत असे. या बादशाही छावणीचा विस्तार वींस चौरस मैल होता. बादशहा